ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव ईयोब असे होते; तो सात्त्विक व सरळ होता; तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राही. त्याला सात पुत्र व तीन कन्या झाल्या. सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजनसमारंभ करीत, व त्या वेळी आपल्या तिन्ही बहिणींना पंक्तीला बोलावीत. हे भोजनसमारंभ आटोपल्यावर ईयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी; तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलींचे हवन करी; कारण तो म्हणे की, “न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल.” असा ईयोबाचा नित्यक्रम असे.
ईयोब 1 वाचा
ऐका ईयोब 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 1:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ