हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादि काळापासून आहेस ना? आम्ही मरणार नाही.1 हे परमेश्वरा, तू त्यांचा न्याय नेमला आहेस. हे दुर्गा, त्याचे शासन व्हावे म्हणून तू त्याला स्थापले आहेस. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही, तो तू ह्या बेइमानी करणार्यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्याला दुष्ट गिळून टाकतो तेव्हा तू का उगा राहतोस? तू मानवांना समुद्रातील माशांप्रमाणे का केले आहेस, कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूंप्रमाणे त्यांना का केले आहेस? तो त्या सर्वांना गळाने उचलतो, त्यांना आपल्या जाळ्यात धरतो, आपला पाग टाकून त्यांना गोळा करतो; त्यामुळे तो हर्षित व आनंदित होतो. तो आपल्या जाळ्यांपुढे यज्ञ करतो, आपल्या पागाला विपुल धूप दाखवतो; कारण त्यांपासून त्याला विपुल धन व पुष्टिकारक अन्न मिळते. तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काहीएक गय न करता त्यांचा सतत घात करत राहील काय?
हबक्कूक 1 वाचा
ऐका हबक्कूक 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: हबक्कूक 1:12-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ