YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 11

11
शहाण्याचे आचरण
1आपले अन्न जलाशयावर सोड; ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल.
2तू सातआठ जणांस वाटा दे; कारण पृथ्वीवर काय अनिष्ट प्रसंग येईल ते तुला ठाऊक नाही.
3मेघ जलपूर्ण झाले म्हणजे ते स्वतःला पृथ्वीवर रिचवतात; झाड दक्षिणेकडे पडो की उत्तरेकडे पडो, ते पडेल त्याच ठिकाणी राहणार.
4जो वारा पाहत राहतो, तो पेरणी करणार नाही; जो मेघांचा रंग पाहत बसतो, तो कापणी करणार नाही.
5वार्‍याची1 गती कशी असते, गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही; तसेच सर्वकाही घडवणार्‍या देवाची कृती तुला कळत नाही.
6सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नकोस; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.
7प्रकाश खरोखर मनोहर असतो; सूर्यदर्शन नेत्रांना रम्य असते.
8मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावीत; अंधकाराचे दिवस बहुत असणार हे तो मनात वागवो; जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे!
तरुण पिढीस बोध
9हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.
10ह्यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.

सध्या निवडलेले:

उपदेशक 11: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन