उपदेशक 10
10
मूर्खपणाचे परिणाम
1गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्यांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा ह्यांवर बसतो.
2शहाण्याचे मन उजवीकडे पण मूर्खाचे मन डावीकडे असते.
3मूर्ख आपल्या बुद्धीशी फारकत करून वाटेने चालला असता ज्याला-त्याला म्हणतो, तू मूर्ख आहेस.
4तुझ्यावर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नकोस, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात.
5भूतलावर मी एक अनिष्ट पाहिले, ते अधिपतीच्या चुकीने होते असे मला दिसले;
6ते हे की मूर्खत्व अति प्रतिष्ठित स्थानी स्थापित होते, आणि श्रीमंतांना नीच स्थानी बसावे लागते.
7चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले.
8जो खड्डा खणतो तोच त्यात पडतो; जो कुंपण तोडतो त्याला सर्प डसतो.
9धोंडे फोडणार्याला त्यांपासून इजा होते; लाकडे तोडणारा त्यांमुळे धोक्यात येतो.
10लोखंडी हत्यार बोथटले व त्याला धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. कार्यसिद्धीस ज्ञान उपयोगाचे आहे.
11सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकांचा काही उपयोग नाही.
12शहाण्याच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात; पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते.
13त्याच्या तोंडच्या शब्दांच्या आरंभी मूर्खपणा व त्याच्या भाषणाच्या अंती अपायकारक वेडेपणा असतो.
14मूर्ख फार वाचाळपणा करतो, परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते; त्याच्यामागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल?
15मूर्ख श्रम करून करून थकतो पण त्याला शहराची वाटदेखील उमगत नसते.
16हे देशा, तुझा राजा अल्पवयी असला व तुझे सरदार प्रातःकाळी उठून खातपीत बसले तर तुझी दुर्दशा केवढी!
17हे देशा, तुझा राजा कुलीन घराण्यातला असला व तुझे सरदार नशेसाठी नव्हे तर बलप्राप्तीसाठी योग्य वेळी भोजन करीत असले तर तू धन्य!
18आळसाने घराचे छप्पर खाली येते; हाताच्या सुस्तीने घर गळते.
19ख्यालीखुशालीसाठी मेजवानी करतात; द्राक्षारस जिवास उल्लास देतो; पैशाने सर्वकाही साध्य होते.
20तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नकोस; आपल्या निजायच्या खोलीतसुद्धा श्रीमंताना शिव्याशाप देऊ नकोस; कारण अंतराळातले पाखरू तुझे शब्द घेऊन उडून जाईल; पक्षी तुझी गोष्ट प्रकट करील.
सध्या निवडलेले:
उपदेशक 10: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.