YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 12:24-31

२ शमुवेल 12:24-31 MARVBSI

मग दाविदाने आपली स्त्री बथशेबा हिचे सांत्वन केले, तो तिच्यापाशी जाऊन निजला. त्यानंतर तिला पुत्र झाला, त्याने त्याचे नाव शलमोन ठेवले; परमेश्वराला तो प्रिय झाला. त्याने नाथान संदेष्टा ह्याच्या द्वारे सांगून पाठवल्यावर परमेश्वरासाठी त्याचे नाव यदीद्या (परमेश्वराला प्रिय) असे ठेवले. नंतर यवाबाने अम्मोन्यांच्या राब्बा ह्या नगराशी लढून ते राजनगर हस्तगत केले. यवाबाने दाविदाकडे जासूद पाठवून त्याला कळवले की, “मी राब्बा नगराबरोबर लढलो व जलनगर हस्तगत केले आहे. तर आता अवशिष्ट लोक जमा करून, नगरापुढे छावणी देऊन ते हस्तगत करा; मी ते घ्यावे व माझे नाव व्हावे असे न होवो.” तेव्हा दावीद सर्व लोकांना जमा करून राब्बा नगराकडे गेला, व त्याने ते लढून घेतले. त्याने त्या लोकांच्या राजाच्या1 मस्तकावरून मुकुट काढला; त्याचे वजन सोन्याचा एक किक्कार2 असून तो रत्नखचित होता, तो दाविदाच्या मस्तकावर ठेवला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली. त्याने त्या नगराच्या रहिवाशांना बाहेर काढले व त्यांना करवती, लोखंडी दाताळी, लोखंडी कुर्‍हाडी ह्यांचे3 आणि विटांच्या भट्ट्यांचे काम करायला लावले; अम्मोन्यांच्या सर्व नगरांचेही त्याने असेच केले. मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमेला परत आला.