YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 12:24-31

२ शमुवेल 12:24-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग दाविदाने आपली स्त्री बथशेबा हिचे सांत्वन केले, तो तिच्यापाशी जाऊन निजला. त्यानंतर तिला पुत्र झाला, त्याने त्याचे नाव शलमोन ठेवले; परमेश्वराला तो प्रिय झाला. त्याने नाथान संदेष्टा ह्याच्या द्वारे सांगून पाठवल्यावर परमेश्वरासाठी त्याचे नाव यदीद्या (परमेश्वराला प्रिय) असे ठेवले. नंतर यवाबाने अम्मोन्यांच्या राब्बा ह्या नगराशी लढून ते राजनगर हस्तगत केले. यवाबाने दाविदाकडे जासूद पाठवून त्याला कळवले की, “मी राब्बा नगराबरोबर लढलो व जलनगर हस्तगत केले आहे. तर आता अवशिष्ट लोक जमा करून, नगरापुढे छावणी देऊन ते हस्तगत करा; मी ते घ्यावे व माझे नाव व्हावे असे न होवो.” तेव्हा दावीद सर्व लोकांना जमा करून राब्बा नगराकडे गेला, व त्याने ते लढून घेतले. त्याने त्या लोकांच्या राजाच्या1 मस्तकावरून मुकुट काढला; त्याचे वजन सोन्याचा एक किक्कार2 असून तो रत्नखचित होता, तो दाविदाच्या मस्तकावर ठेवला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली. त्याने त्या नगराच्या रहिवाशांना बाहेर काढले व त्यांना करवती, लोखंडी दाताळी, लोखंडी कुर्‍हाडी ह्यांचे3 आणि विटांच्या भट्ट्यांचे काम करायला लावले; अम्मोन्यांच्या सर्व नगरांचेही त्याने असेच केले. मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमेला परत आला.

सामायिक करा
२ शमुवेल 12 वाचा

२ शमुवेल 12:24-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

दावीदाने मग आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीरसंबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराची प्रीती होती. त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला. नाथानने त्याचे नाव यदीद्या, म्हणजेच देवाला प्रिय असे ठेवले. परमेश्वराच्या वतीने नाथानने हे केले. अम्मोन्यांच्या राब्बावर हल्ला करून यवाबाने हे राजधानीचे नगर काबीज केले. यवाबाने निरोप्यामार्फत दावीदाला निरोप पाठवला राब्बाशी लढाई देऊन मी हे जलनगर हस्तगत केले आहे. आता इतर लोकांस एकत्र आणून या शहराचा ताबा घ्या मी घेण्यापूर्वी हे करा. मी जर आधी ताबा घेतला तर ते नगर माझ्या नावाने ओळखले जाईल. मग दावीद सर्व लोकांस घेऊन राब्बाकडे गेला. राब्बा येथे लढाई करून त्याने त्याचा ताबा घेतला. त्यांच्या राजाच्या मस्तकावरचा मुकुट दावीदाने काढला. हा मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सुमारे एक किक्कार होते. त्यामध्ये मौल्यवान रत्ने जडवलेली होती, तो मुकुट लोकांनी दावीदाच्या मस्तकावर ठेवला. दावीदाने बऱ्याच किंमती वस्तू आपल्याबरोबर आणल्या. राब्बा नगरातील लोकांसही त्याने बाहेर नेले त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीट कामही करून घेतले. सर्व अम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरूशलेमेला परतला.

सामायिक करा
२ शमुवेल 12 वाचा