YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 16:8-22

१ इतिहास 16:8-22 MARVBSI

परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याचे नाम घ्या; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा. त्याला त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा; ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांवर भरवसा ठेवा; त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा; त्याचा सेवक इस्राएल ह्याचे वंशजहो, त्याने निवडलेल्या याकोबाच्या वंशजांनो, तुम्ही असे करा. तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीवर आहेत. त्याच्या कराराचे निरंतर स्मरण करा, हजारो पिढ्यांसाठी त्याने आज्ञापिलेले वचन आठवा; हा करार त्याने अब्राहामाशी केला आणि त्याविषयी इसहाकाशी शपथ वाहिली, ती त्याने याकोबासाठी नियम, इस्राएलासाठी सर्वकाळचा करार ह्या रूपाने कायम केली; तो म्हणाला, “कनान देश तुझा वतनभाग म्हणून तुला देईन” त्या वेळी तुम्ही मोजके, फार थोडे होता, व त्या देशात तुम्ही उपरे होता. ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्‍या लोकांत हिंडले. त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही. त्यांच्यासाठी त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की, “माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”