YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 11:20-47

१ इतिहास 11:20-47 MARVBSI

यवाबाचा भाऊ अबीशय हा त्या तिघांचा प्रमुख होता; त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले; त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले. त्या तिघांमध्ये त्याची महती विशेष होती म्हणून तो त्यांचा नायक झाला; तरी तो पहिल्या तिघांच्या योग्यतेस पोहचला नाही. कबसेल येथला एक मनुष्य होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नावाच्या पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहास ठार केले. मग त्याने पाच हात उंचीच्या एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार केले; त्या मिसर्‍याच्या हाती साळ्याच्या तुरीसारखा एक भाला होता; पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला व त्याने त्या मिसर्‍याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्या भाल्याने त्याचा वध केला. असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले. त्या तिसांहून त्याची महती विशेष होती तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही; दाविदाने त्याला आपल्या हुजरातीवर नेमले. सैन्यातील वीर हे : यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमाच्या दोदोचा पुत्र एलहानान, शम्मोथ हरोरी, हेलस पलोनी, इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा, अबियेजेर, अनाथोथी, सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही, महरय नटोफाथी, बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेद, बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी, गाशाच्या ओढ्यांजवळचा हूरय अबीएल अर्बाथी, अजमावेथ बहरूमी, अलीहबा शालबोनी, गिजोनकर हाशेमाचे पुत्र, हरारी शागे ह्याचा पुत्र योनाथान, हरारी साखार ह्याचा पुत्र अहीयाम, ऊराचा पुत्र अलीफल, हेफेर मखेराथी, अहीया पलोनी, हेस्री कर्मेली, एजबयाचा पुत्र नारय, नाथानाचा भाऊ योएल, हग्रीचा पुत्र मिभार, सेलक अम्मोनी, सरूवेचा पुत्र यवाब ह्याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, ईरा इथ्री, गारेब इथ्री, उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद, रऊबेनी शीजा ह्याचा पुत्र अदीना. हा रऊबेन्यांचा सरदार, त्याच्याबरोबर तीस जण असत, माकाचा पुत्र हानान, योशाफाट मिथनी, उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी ह्याचे पुत्र शमामा व यहीएल, शिम्रीचा पुत्र यदीएल व त्याचा भाऊ योहा तीसी, अलिएल महवी व एलानामाचे पुत्र यरीबय व योशव्या, इथ्मा मवाबी, अलीएल, ओबेद आणि यासीएल मसोबायी.