YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 11:20-47

१ इतिहास 11:20-47 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यवाबाचा भाऊ अबीशय हा त्या तिघांचा प्रमुख होता; त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले; त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले. त्या तिघांमध्ये त्याची महती विशेष होती म्हणून तो त्यांचा नायक झाला; तरी तो पहिल्या तिघांच्या योग्यतेस पोहचला नाही. कबसेल येथला एक मनुष्य होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नावाच्या पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहास ठार केले. मग त्याने पाच हात उंचीच्या एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार केले; त्या मिसर्‍याच्या हाती साळ्याच्या तुरीसारखा एक भाला होता; पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला व त्याने त्या मिसर्‍याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्या भाल्याने त्याचा वध केला. असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले. त्या तिसांहून त्याची महती विशेष होती तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही; दाविदाने त्याला आपल्या हुजरातीवर नेमले. सैन्यातील वीर हे : यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमाच्या दोदोचा पुत्र एलहानान, शम्मोथ हरोरी, हेलस पलोनी, इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा, अबियेजेर, अनाथोथी, सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही, महरय नटोफाथी, बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेद, बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी, गाशाच्या ओढ्यांजवळचा हूरय अबीएल अर्बाथी, अजमावेथ बहरूमी, अलीहबा शालबोनी, गिजोनकर हाशेमाचे पुत्र, हरारी शागे ह्याचा पुत्र योनाथान, हरारी साखार ह्याचा पुत्र अहीयाम, ऊराचा पुत्र अलीफल, हेफेर मखेराथी, अहीया पलोनी, हेस्री कर्मेली, एजबयाचा पुत्र नारय, नाथानाचा भाऊ योएल, हग्रीचा पुत्र मिभार, सेलक अम्मोनी, सरूवेचा पुत्र यवाब ह्याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, ईरा इथ्री, गारेब इथ्री, उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद, रऊबेनी शीजा ह्याचा पुत्र अदीना. हा रऊबेन्यांचा सरदार, त्याच्याबरोबर तीस जण असत, माकाचा पुत्र हानान, योशाफाट मिथनी, उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी ह्याचे पुत्र शमामा व यहीएल, शिम्रीचा पुत्र यदीएल व त्याचा भाऊ योहा तीसी, अलिएल महवी व एलानामाचे पुत्र यरीबय व योशव्या, इथ्मा मवाबी, अलीएल, ओबेद आणि यासीएल मसोबायी.

सामायिक करा
१ इतिहास 11 वाचा

१ इतिहास 11:20-47 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यवाबाचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. या तिघा सैनिकांबरोबर त्याचा उल्लेख नेहमीच केला जातो. या तिघांपेक्षा त्याचा मान जास्त झाला आणि त्यास त्यांचा नायक करण्यात आले, तरीपण, त्याची किर्ती त्या तीन सुप्रसिध्द सैनिकासारखी झाली नाही. कबसेल येथला एक बलवान मनुष्य होता, त्याचा पुत्र यहोयादा बनाया याने पुष्कळ पराक्रम केले. त्याने मवाबातील अरीएलाच्या दोन पुत्रांना ठार केले. बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला. मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने ठार मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसरी सैनिकाला ठार केले. यहोयादाचा पुत्र बनाया याने असे बरेच पराक्रम केले. त्याने अगदी तीन शूरवीरासारखे नाव मिळवले होते. तीस शूरांपेक्षा बनाया अधिक सन्माननीय होता. पण तो त्या तिघांच्या पदास पोहचला नाही. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले. सैन्यातील शूर सैनिक यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान, हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी, तकोइच्या इक्केशचा पुत्र ईरा, अनाथोथचा अबीयेजर सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही. महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा पुत्र हेलेद, बन्यामिनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी, गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय, अबीएल अर्बाथी, अजमावेथ बहरुमी, अलीहाबा शालबोनी. हामेश गिजोनी याचे पुत्र, शागे हरारी याचा पुत्र योनाथान, हरारी साखार याचा पुत्र अहीयाम, ऊरचा पुत्र अलीफल, हेफेर मखेराथी, अहीया पलोनी, हेस्री कर्मेली, एजबयचा पुत्र नारय. नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा पुत्र मिभार, सेलक अम्मोनी, सरुवेचा पुत्र यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, ईरा, इथ्री, गारेब, इथ्री, उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद. शीजा रऊबेनी याचा पुत्र अदीना हा रऊबेन्याचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक, माकाचा पुत्र हानान आणि योशाफाट मिथनी, उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे पुत्र शामा व ईयेल. शिम्रीचा यदीएल योहा तीसी आणि त्याचा भाऊ योहा अलीएल महवी व एलानामचे पुत्र यरीबय आणि योशव्या व इथ्मा मवाबी, अलीएल, ओबेद आणि यासीएल मसोबायी.

सामायिक करा
१ इतिहास 11 वाचा

१ इतिहास 11:20-47 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

योआबाचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांविरुद्ध उगारून त्यांचा वध केला होता, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता. या तिघांपेक्षा त्याला दुप्पट सन्मान दिला गेला आणि तो त्या तिघांचाही सेनापती झाला, जरी त्या तिघांमध्ये त्याची गणती केली नाही. कबसेल येथील यहोयादाचा पुत्र बेनाइयाह एक शूर मनुष्य होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे हिमवर्षावाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले. एकदा त्याने पाच हात उंचीच्या इजिप्ती मनुष्याला जिवे मारले होते. त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, तरी बेनाइयाह केवळ आपली विणकर्‍याची काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला ठार मारले. यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती. इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले. दावीदाचे पराक्रमी योद्धे हे होते: योआबाचा भाऊ असाहेल, बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान, हरोरचा शम्मोथ, पलोनी हेलेस, तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा, अनाथोथचा अबिएजेर, हुशाथचा सिब्बखय, अहोहचा ईलाय, नटोफाथी माहाराई, नटोफाथी बाअनाहचा पुत्र हेलेद, गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तय, पिराथोनचा बेनाइयाह, गाशाच्या ओढ्याजवळचा हूरय, अर्बाथचा अबीएल, बहरूमचा अजमावेथ, शालबोनचा एलीहबा, गिजोन येथील हाशेमचे पुत्र, हरार येथील शागे याचा पुत्र योनाथान, हरार येथील साखार याचा पुत्र अहीयाम, ऊरचा पुत्र एलिफाल, मकेराथी हेफेर, पलोनी अहीयाह, कर्मेलचा हेस्रो, एजबयाचा पुत्र नाराय, नाथानाचा भाऊ योएल, हागरीचा पुत्र मिभार, अम्मोनी सेलेक, जेरुइयाहचा पुत्र योआब याचा शस्त्रवाहक बैरोथचा नाहाराई, इथ्री येथील ईरा, इथ्री येथील गारेब, उरीयाह हिथी, अहलायाचा पुत्र जाबाद, शीझाचा पुत्र अदीना, तो रऊबेनच्या गोत्रातील एकतीस पुढार्‍यांपैकी एक होता. माकाहचा पुत्र हानान, मिथनी योशाफाट, अष्टराथी उज्जिया, अरोएर येथील होथामाचे पुत्र शामा व ईयेल, शिम्रीचा पुत्र यदिएल, व तीसा येथील त्याचा भाऊ योहा, महवी येथील एलीएल, व एलानामाचे पुत्र यरीबय व योशव्याह, मोआबी इथ्माह, मसोबी एलीएल, ओबेद आणि यासीएल.