त्याच दिवशी, मोशेचे नियमशास्त्र मोठ्याने वाचण्यात येत असताना, लोकांना एक विधान ऐकावयास मिळाले. त्यात असे लिहिले होते की अम्मोनी व मोआबींना परमेश्वराच्या सभामध्ये प्रवेश करण्याची कधीही परवानगी देण्यात येऊ नये, कारण त्यांनी इस्राएली लोकांना अन्न व पाण्याचा पुरवठा केला नाही. उलट त्यांनी त्यांना शाप देण्यासाठी बलामाला पैसे देऊन बोलाविले. (पण परमेश्वराने त्या शापाचे रूपांतर आशीर्वादात केले ही गोष्ट वेगळी.)