1
याकोब 1:2-3
मराठी समकालीन आवृत्ती
माझ्या बंधुंनो आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या परीक्षेंना तोंड देता तेव्हा त्यात अत्यानंद माना. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा होते त्यामुळे धीर उत्पन्न होतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा याकोब 1:2-3
2
याकोब 1:5
जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात.
एक्सप्लोर करा याकोब 1:5
3
याकोब 1:19
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, प्रत्येकजण ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश व रागास मंद असावा.
एक्सप्लोर करा याकोब 1:19
4
याकोब 1:4
धीराला कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही परिपक्व आणि पूर्ण व्हावे व तुम्हाला कशाचीही कमतरता भासू नये.
एक्सप्लोर करा याकोब 1:4
5
याकोब 1:22
वचन केवळ ऐकून स्वतःची फसवणूक करू नका. वचन सांगते त्याप्रमाणे आचरण करा.
एक्सप्लोर करा याकोब 1:22
6
याकोब 1:12
जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, जो जीवनी मुकुट प्रभुने आपल्यावर प्रीती करणार्यांना देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल.
एक्सप्लोर करा याकोब 1:12
7
याकोब 1:17
प्रत्येक उत्तम व परिपूर्ण दान वरून आहे, ते स्वर्गातील प्रकाशाचा पिता जो छायेसारखा बदलत नाही त्याच्यापासून येते.
एक्सप्लोर करा याकोब 1:17
8
याकोब 1:23-24
कारण जो कोणी वचन ऐकतो, पण त्याप्रमाणे आचरण करत नाही, तो आरशात आपले मुख पाहणार्यासारखा आहे. तो स्वतःकडे पाहिल्यावर निघून जातो आणि आपण कसे दिसत होतो हे ताबडतोब विसरतो.
एक्सप्लोर करा याकोब 1:23-24
9
याकोब 1:27
परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.
एक्सप्लोर करा याकोब 1:27
10
याकोब 1:13-14
मोह आल्यानंतर, “परमेश्वर मला मोहात टाकत आहे” असे कोणीही म्हणू नये. कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही; परंतु प्रत्येक मनुष्य त्याच्या स्वतःच्या दुष्ट वासनेने ओढला व भुलविला जाऊन मोहात पडतो.
एक्सप्लोर करा याकोब 1:13-14
11
याकोब 1:9
गरीब परिस्थितीतील विश्वासू जणांनी आपल्या उच्च पदाबद्दल अभिमान बाळगावा.
एक्सप्लोर करा याकोब 1:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ