1
रोमकरांना 14:17-18
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
कारण खाणे व पिणे ह्यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे आणि अशा प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो, तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोमकरांना 14:17-18
2
रोमकरांना 14:8
जर आपण जगतो, तर प्रभूकरता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो, म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत.
एक्सप्लोर करा रोमकरांना 14:8
3
रोमकरांना 14:19
तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक ठरणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण लागावयास हवे.
एक्सप्लोर करा रोमकरांना 14:19
4
रोमकरांना 14:13
म्हणून आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये, तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे किंवा अडखळण होईल असे काही ठेवू नये.
एक्सप्लोर करा रोमकरांना 14:13
5
रोमकरांना 14:11-12
धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: प्रभू म्हणतो, ‘ज्याअर्थी मी जिवंत आहे, त्याअर्थी माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघे टेकील व प्रत्येक जीभ मी देव आहे, हे कबूल करील.’ तर मग आपणातील प्रत्येक जणाला आपापल्यासंबंधी देवाला हिशेब द्यावा लागणार आहे.
एक्सप्लोर करा रोमकरांना 14:11-12
6
रोमकरांना 14:1
जो विश्वासात दुर्बल आहे त्याला जवळ करा, पण व्यक्तिगत मतांविषयी वाद घालू नका.
एक्सप्लोर करा रोमकरांना 14:1
7
रोमकरांना 14:4
दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो यशस्वी होतो किंवा अयशस्वी ठरतो हा त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर यशस्वी करण्यात येईल कारण त्याला यशस्वी करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.
एक्सप्लोर करा रोमकरांना 14:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ