“इस्राएलातल्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्राएल लोकांतून लेवी वंश घेतला आहे; लेवी वंशातील लोक माझेच आहेत;
कारण प्रथमजन्मलेले सर्व माझेच आहेत; ज्या दिवशी मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारून टाकले त्याच दिवशी इस्राएल लोकांतील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले; ते माझेच आहेत; मी परमेश्वर आहे.”