गणना 3:12-13
गणना 3:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा, मी इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांस निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील. “सर्व प्रथम जन्मलेले माझेच आहेत. मी मिसर देशात सर्व प्रथम जन्मलेल्यांना मारून टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरुषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले. ते माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.”
गणना 3:12-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“इस्राएली लोकांतील प्रत्येक स्त्रीच्या पोटी प्रथम जन्मलेल्या पुत्रांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. लेवी लोक माझे आहेत, कारण सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. ज्या दिवशी इजिप्तमध्ये मी सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, त्या दिवशी इस्राएलातील प्रत्येक प्रथम जन्मलेले मी माझ्यासाठी समर्पित करून घेतले, ते मनुष्य असो किंवा पशू, ते माझे आहेत, मीच याहवेह आहे.”
गणना 3:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“इस्राएलातल्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्राएल लोकांतून लेवी वंश घेतला आहे; लेवी वंशातील लोक माझेच आहेत; कारण प्रथमजन्मलेले सर्व माझेच आहेत; ज्या दिवशी मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारून टाकले त्याच दिवशी इस्राएल लोकांतील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले; ते माझेच आहेत; मी परमेश्वर आहे.”