1
यशया 6:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.”
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 6:8
2
यशया 6:3
ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1
एक्सप्लोर करा यशया 6:3
3
यशया 6:5
तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”
एक्सप्लोर करा यशया 6:5
4
यशया 6:1
उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले; त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते.
एक्सप्लोर करा यशया 6:1
5
यशया 6:7
तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, “पाहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे.”
एक्सप्लोर करा यशया 6:7
6
यशया 6:2
त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहा-सहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे.
एक्सप्लोर करा यशया 6:2
7
यशया 6:6
मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला.
एक्सप्लोर करा यशया 6:6
8
यशया 6:9
तो म्हणाला, “जा, ह्या लोकांना सांग की : ‘ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा, पण जाणू नका.’
एक्सप्लोर करा यशया 6:9
9
यशया 6:10
ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून माझ्याकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.”
एक्सप्लोर करा यशया 6:10
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ