1
यशया 26:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 26:3
2
यशया 26:4
परमेश्वरावर सर्वकाळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश हा सनातन आश्रयदुर्ग आहे.
एक्सप्लोर करा यशया 26:4
3
यशया 26:9
रात्री माझ्या जिवास तुझी उत्कंठा लागली; मी अगदी अंत:करणपूर्वक तुझा शोध करीन; कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे नीतिमत्ता शिकतात.
एक्सप्लोर करा यशया 26:9
4
यशया 26:12
हे परमेश्वरा, आमच्यासाठी तू शांतता स्थापीत करशील; कारण तू आमच्यासाठी आमची सर्व कार्ये साधली आहेत.
एक्सप्लोर करा यशया 26:12
5
यशया 26:8
हे परमेश्वरा, तुझ्या न्यायमार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करीत आहोत; तुझ्या नामाची व तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जिवास लागून राहिली आहे.
एक्सप्लोर करा यशया 26:8
6
यशया 26:7
नीतिमानाचा मार्ग नीट आहे; तू न्यायपरायण असून नीतिमानाची गती सरळ करतोस.
एक्सप्लोर करा यशया 26:7
7
यशया 26:5
उच्च स्थळी राहणार्यांना त्याने खाली आणले आहे; त्याने उच्च नगर पाडून टाकले आहे, जमीनदोस्त केले आहे; धुळीस मिळवले आहे.
एक्सप्लोर करा यशया 26:5
8
यशया 26:2
वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे नीतिमान राष्ट्र आत येईल.
एक्सप्लोर करा यशया 26:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ