अबशालोमाची दाविदाच्या सेवकांशी अकस्मात गाठ पडली. अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता; खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या दाट फांद्यांखालून चालले असताना अबशालोमाचे डोके त्या वृक्षाला अडकून तो अधांतरी लटकत राहिला व ते खेचर त्याच्याखालून निघून गेले.
हे पाहून एका माणसाने यवाबाला सांगितले की, “अबशालोम एका झाडाला लटकत असलेला मी पाहिला.”