मार्क 5

5
येशु दुष्ट आत्मा लागेल माणुसले बरा करस
(मत्तय ८:२८-३४; लूक ८:२६-३९)
1मंग येशु अनी त्याना शिष्य गालील समुद्रना पलिकडला गरसेकरसना प्रदेशमा वनात. 2येशु नावमातीन उतरना, तवय एक दुष्ट आत्मा लागेल माणुस कब्रस्तान माईन ईसन त्याले भेटना. 3तो कब्रस्तानमाच राहे अनं साखळ्याघाई बांधीनसुध्दा तो कोनाचघाई आवराये नही; 4कारण त्याले बराचदाव बेड्यासघाई अनी साखळ्याघाई बांध तरी तो साखळ्या तोडी टाके अनं बेड्यासना चुराडा करे, त्याले आवरानी ताकद कोनामाच नव्हती. 5तो रातदिन कब्रस्तानमा अनं डोंगरंसमा वरडत फिरे, स्वतःले दगडसघाई ठेचीले.
6जवय त्यानी येशुले दुरतीन दखं, तवय तो पयत ईसन त्याना समोर पाया पडीन; 7अनी जोरमा वरडीन बोलना, “हे येशु, परमप्रधान देवना पोऱ्या! तुले मनाकडतीन काय तरास शे? मी तुले देवनी शपथ घालस, तू माले शिक्षा देऊ नको!” 8कारण येशु त्याले बोलना व्हता, “हे दुष्ट आत्मा, ह्या माणुस माईन निंघी जाय!”
9येशुनी त्याले ईचारं, “तुनं नाव काय शे?” तो बोलना, “मनं नाव ‘सैन्य’ शे, कारण आम्हीन बराच शेतस!” 10अनी आमले ह्या प्रदेशमाईन काढु नको; अशा ईनंत्या दुष्ट आत्मासनी येशुले कऱ्यात.
11तठेच डोंगरजोडे डूकरंसना मोठा कळप चरी राहींता. 12दुष्ट आत्मासनी त्याले ईनंती करी की, “आमले त्या डुकरंसमा घुसू दे.” 13त्यानी त्यासले परवानगी दिधी. मंग त्या दुष्ट आत्मा त्या माणुस मातीन निंघीसन डुकरंसमा घुसनात अनी त्या जवळपास दोन हजार डुकरे व्हतात. त्या पयत जाईसन कडावरतीन समुद्रमा पडीसन मरनात.
14मंग डुकरं चारनारासनी पयत जाईसन हाई बातमी गावमा अनं वावरंसमा लोकसले सांगी. तवय काय व्हयनं हाई दखाकरता लोके तठे वनात. 15तवय त्या येशु जोडे वनात, अनी त्यासनी ज्यानामा दुष्ट आत्मा व्हतात म्हणजेच सैन्य व्हतं. त्याले शुध्दीवर येल अनं कपडा घालेल दखं, तवय त्यासले भिती वाटनी. 16ज्यासनी डोयासघाई दुष्ट आत्मा लागेल माणुसनी अनी डुकरंसनी हकीकत दखेल व्हती ती त्यासले सांगी.
17तवय त्या ईनंती करीसन येशुले सांगु लागनात, तुम्हीन आमना प्रदेशमातीन निंघी जा.
18मंग तो नावमा बसताच, बरा व्हयेल माणुस त्याले ईनंती करीसन बोलना, “मालेपण तुमनासंगे लयी चला!”
19पण त्यानी त्याले येऊ दिधं नही. तर त्याले सांगं, तु घर जाय, आपला लोकसले सांगं, तुनावर दया करीसन प्रभुने तुनाकरता कितलं मोठं कार्य करेल शे.
20मंग दुष्ट आत्मा लागेल माणुसनी घडेल सर्व कार्य येशुनी जे त्यानाकरता करेल व्हतं, ते तो सर्व दकापलीस म्हणजे दहा गावसना शहरमा जाईसन सांगाले लागना, तवय सर्व लोकसले आश्चर्य वाटनं.
मरेल पोर अनी रक्तस्रावी बाई
(मत्तय ९:१८-२६; लूक ८:४०-५६)
21मंग येशु नावमा बशीसन परत पलीकडला काठवर गया. तठे त्यानाजोडे लोकसनी मोठी गर्दी जमनी तवय तो समुद्रजोडेच व्हता. 22याईर नावना एक सभास्थानना अधिकारी तठे वना अनं येशुले दखीसन त्याना पाया पडना. 23तवय तो येशुले कळकळ करीसन ईनंती करू लागना की, “मनी धाकली पोर मराले टेकेल शे. ती वाचाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन ईसन तिना डोकावर हात ठेवा!”
24मंग येशु त्यानासंगे जावाले निंघना तवय लोकसनी मोठी गर्दी बी त्याना मांगे निंघनी. अनी त्यासनी त्याना आजुबाजू गर्दी करी.
25ती गर्दीमा एक बाई व्हती तिले बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हता, 26तिनाजोडे व्हतं नव्हतं तितलं सगळंच खर्चाई जायल व्हतं. तिले बराच तरास व्हता म्हणीन तिनी वैद्यसकडतीन ईलाज करा तरी फरक पडना नही, उलटा आजार जास्तीज वाढी जायेल व्हता. 27ती येशु बद्दलन्या गोष्टी ऐकीसन त्या गर्दीमा घुसनी अनी त्यानाकडे ईसन त्याना कपडासले हात लाया, 28कारण ती सांगे, “मी याना कपडासले जरी हात लावसु तरी बरी व्हसु.”
29तवय लगेच तिना रक्तस्राव बंद व्हई गया अनं तिना शरिरले जानवणं मी या आजारपाईन मुक्त व्हई जायल शे. 30तवय येशुनी हाई लगेच वळखं की, आपलामातीन शक्ती निंघनी, तवय त्यानी मांगे वळीन गर्दीमा ईचारं, “मना कपडासले कोणी हात लाया?”
31पण त्याना शिष्य त्याले बोलनात, “लोकसनी गर्दी आपला आजुबाजूले शे हाई तुम्हीन दखी राहीनात; तरी माले कोणी हात लाया, हाई कसं काय ईचारी राहीनात?”
32तरी बी हाई कोणी करं, हाई दखाकरता येशुनी चारीबाजुले नजर फिराई. 33तवय ती बाई तिनासंगे जे काही घडेल व्हतं. तिनी ते वळखं अनी घाबरीसन अनं थरथर कापत त्यानापुढे वनी अनी गुडघा टेकिन त्यानापुढे पडीसन तिनी त्याले घडेल सर्वकाही खरंखरं सांगं. 34येशु तिले बोलना, “बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे. सुखरूप जाय, तुना आजारपाईन तु मुक्त शे.”
35येशु हाई बोली राहींता ईतलामा तठे सभास्थानना अधिकारीना घरतीन काही लोकसनी ईसन अधिकारीले सांगं की, “तुमनी पोर मरी गई. आत्ते गुरजीले कशाले तरास देतस.”
36तवय येशुनी त्यासनं बोलनं ऐकं, पण त्यासनाकडे ध्यान नही देता तो सभास्थानना अधिकारीले बोलना, “घाबरू नको, ईश्वास ठेव.” 37तवय त्यानी पेत्र, याकोब, अनं याकोबना भाऊ योहान यासना शिवाय त्यानी आपलासंगे कोणलेच येऊ दिधं नही. 38अनी त्या अधिकारीना घरना जोडे येताच येशुनी हंबरडा फोडीन रडणारासना अनं शोक करणारसना गोंधळ व्हयेल दखा. 39तो मजार जाईसन त्यासले बोलना, “तुम्हीन कसाले रडतस अनी गोंधळ करतस? पोर मरेल नही, झोपेल शे!”
40तवय त्यासनी त्यानी थट्टा करी, पण त्यानी त्या सर्वासले बाहेर काढी दिधं अनी पोरना माय बापले अनी आपला तिन शिष्यसले लिसन पोर व्हती त्या खोलीमा गया. 41मंग त्या पोरना हात धरीसन तो बोलना, “तलिथा कुम” याना अर्थ, “पोरी, मी तुले सांगस ऊठ!”
42ती बारा वरीसनी पोर लगेच ऊठीसन चालाले लागनी त्या हाई दखीसन चमकाईनात. 43हाई बात कोणलेच सांगु नका अस येशुनी त्यासले बजाईन सांगं, अनी “हिले काहीतरी खावाले द्या” अस तो त्यासले बोलना.

하이라이트

공유

복사

None

모든 기기에 하이라이트를 저장하고 싶으신가요? 회원가입 혹은 로그인하세요