मत्तय 7

7
इतरासना दोष काढाना बाबत
(लूक ६:३७-३८,४१-४२)
1कोणलेच दोषी ठरावु नका, म्हणजे देव तुमले दोषी ठरावनार नही. 2#मार्क ४:२४ज्याप्रकारमा तुम्हीन न्याय करशात, त्याच प्रकारमा देव तुमना न्याय करी, अनी ज्या मापघाई तुम्हीन मोजीन दिशात. त्याच मापघाई तुमले मोजीन देवामा ई. 3तुना डोयामाधलं मुसळ न दखता आपला भाऊना डोयामाधलं कुसळ कशाले दखस? 4किंवा तुना डोयामाधलं कुसळ माले काढु दे हाई आपला भाऊले तु कसं सांगस? दख, तुना डोयामा तर मुसळ शे. 5अरे ढोंगी, पहिले तुना डोयामाधलं मुसळ काढी टाक म्हणजे तुना भाऊना डोयामाधलं कुसळ काढाकरता तुले स्पष्ट दखाई. 6जे पवित्र शे ते कुत्रासले देऊ नका, अनी मोती डुकरसनासमोर टाकू नका, टाकशात तर त्या आपला पायखाल चेंदतीन अनी पल्टीसन तुमले फाडतीन.
प्रार्थनानं महत्व
(लूक ११:९-१३)
7मांगा म्हणजे तुमले भेटी, शोधा म्हणजे तुमले सापडी, ठोका म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई; 8कारण जो कोणी मांगस त्याले भेटस, जो शोधस, त्याले सापडस अनी जो कोणी दार ठोकस त्यानाकरता उघडाई जास. 9आपला पोऱ्यानी जर भाकर मांगी तर तो त्याले दगड दि? 10अनी मासा मांगा तर त्याले साप दि, तुमनामा असा कोणता बाप शे? 11जर तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं तुमले समजस, तर ज्या तुमना स्वर्गना देवबाप जोडे मांगतस, त्यासले तो कितल्या चांगल्या वस्तु अनं देणग्या दि? 12#लूक ६:३१यामुये लोकसनी तुमनासंगे जसं वागाले पाहिजे अशी तुमनी ईच्छा शे. तसं तुम्हीन बी त्यासनासंगे वागा, कारण मोशेना नियमशास्त्र अनी संदेष्टा, हाईच शिकाडतस.
दोन रस्ता
(लूक १३:२४)
13धाकला दरवाजातीन मजारमा जा; कारण नाशकडे जावाना दरवाजा मोठा शे, अनं रस्ता पसरट शे, अनी त्यानामातीन जाणारा बराच शेतस; 14पण जिवनकडे जावाना दरवाजा, अनी रस्ता छोटा शे. अनं ज्यासले तो सापडस त्या थोडाच शेतस.
खरा अनी खोटा शिक्षक
(लूक ६:४३-४४)
15खोटा संदेष्टासपाईन संभाळीन राहा, कारण त्या मेंढरसना रूपमा येतीन, पण त्या मझारतीन क्रुर लांडगा शेतस. 16तुम्हीन त्यासले त्यासना फळवरतीन वळखशात, कारण काटासना झाडवरतीन द्राक्ष अनं रिंगनीना झाडवरतीन अंजिर काढतस का? 17त्याचप्रमाणे चांगला झाडले चांगलं फळ येस अनं वाईट झाडले वाईट फळ येस. 18चांगला झाडले वाईट फळ येस नही, अनं वाईट झाडले चांगलं फळ येस नही. 19#मत्तय ३:१०; लूक ३:९ज्या-ज्या झाडले चांगलं फळ येस नही ते प्रत्येक झाड तोडीसन अग्नीमा टाकामा येस. 20#मत्तय १२:३३यामुये तुम्हीन त्यासले त्यासना फळवरतीन वळखशात.
मि तुमले वळखस नही
(लूक १३:२५-२७)
21माले प्रभुजी, प्रभुजी म्हणनारा सर्वासना स्वर्गना राज्यमा प्रवेश व्हई अस नही; तर जो मना स्वर्गना पिताना ईच्छाप्रमाणे वागस त्याना प्रवेश व्हई. 22न्यायना दिनले बराचजन माले सांगतीन, प्रभुजी-प्रभुजी आम्हीन तुना नावतीन संदेश दिधा, तुना नावतीन भूतं काढात, अनी तुना नावतीन मोठमोठला चमत्कार करात नही का? 23तवय मी त्यासले स्पष्ट सांगसु की, मनी अनी तुमनी कधीच ओळख नव्हती; अहो पापीसवन मनापाईन दूर व्हा.
दोन घरसना पाया
(लूक ६:४७-४९)
24जो कोणी मनं हाई वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस तो एक शहाणा माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर खडकवर बांध; 25मंग पाऊस पडना, पूर वना, वारा बी सुटना, अनी त्या घरले लागना; तरी ते घर पडनं नही, कारण त्याना पाया खडकवर बांधेल व्हता. 26त्याचप्रमाणे जो कोणी मनं वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस नही तो एक मुर्ख माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर वाळूवर बांधं, 27मंग पाऊस पडना, पुर वना, वारा बी सुटना, अनं त्या घरले लागना तवय ते लगेच पडीसन त्याना नाश व्हयना.
येशुना अधिकार
28 # मार्क १:२२; लूक ४:३२ येशुनी आपलं बोलनं बंद करावर अस व्हयनं की, त्या लोके त्यानं शिक्षण ऐकीन थक्क व्हई गयात; 29कारण तो शास्त्री लोकेसनामायक नही तर पुरा अधिकार त्यालेच शे, असा शिकाडी राहींता.

하이라이트

공유

복사

None

모든 기기에 하이라이트를 저장하고 싶으신가요? 회원가입 혹은 로그인하세요