YouVersion logo
Ikona pretraživanja

उत्पत्ती 5

5
आदाम ते नोआह पर्यंत
1ही आदामाची लिखित वंशावळी आहे.
जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले. 2परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात”#5:2 हिब्रूमध्ये आदाम असे नाव दिले.
3आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले. 4शेथच्या जन्मानंतर आदाम आणखी आठशे वर्षे जगला. याकाळात त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. 5आदाम एकंदर 930 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
6शेथ 105 वर्षाचा झाला, तेव्हा त्याला अनोश झाला. 7अनोशचा पिता झाल्यावर शेथ 807 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. 8शेथ एकंदर 912 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
9अनोश नव्वद वर्षाचा झाला तेव्हा त्याला केनान झाला. 10केनानचा पिता झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. 11अनोश एकंदर 905 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
12केनान सत्तर वर्षाचा झाला तेव्हा तो महलालेलाचा पिता झाला. 13महलालेलाचा पिता झाल्यावर केनान 840 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. 14केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
15महलालेल 65 वर्षाचा झाला तेव्हा तो यारेदाचा पिता झाला. 16यारेदाचा पिता झाल्यावर महलालेल 830 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. 17महलालेल एकंदर 895 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
18यारेद 162 वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा पिता झाला. 19हनोखाचा पिता झाल्यावर यारेद 800 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. 20यारेद एकंदर 962 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
21हनोख 65 वर्षाचा झाला तेव्हा तो मथुशेलहाचा पिता झाला. 22मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. 23हनोख एकंदर 365 वर्षे जगला. 24हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.
25मथुशेलह 187 वर्षाचा झाला तेव्हा तो लामेखाचा पिता झाला. 26लामेखाचा पिता झाल्यानंतर मथुशेलह 782 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. 27मथुशेलह एकंदर 969 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
28लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्याला पुत्र झाला. 29त्याने त्याचे नाव नोआह#5:29 किंवा नोआह अर्थात् दिलासा किंवा विसावा असे ठेवले, कारण तो म्हणाला, “शाप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून याहवेह आम्हाला विसावा देतील.” 30नोआहच्या जन्मानंतर लामेख 595 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. 31लामेख एकंदर 777 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
32नोआह 500 वर्षाचा झाला तेव्हा तो शेम, हाम व याफेथ यांचा पिता झाला.

Istaknuto

Podijeli

Kopiraj

None

Želiš li svoje istaknute stihove spremiti na sve svoje uređaje? Prijavi se ili registriraj