YouVersion logo
Ikona pretraživanja

उत्पत्ती 5

5
आदामाचे वंशज
(१ इति. 1:1-4)
1आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला;
2त्याने त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला; त्यांना उत्पन्न केले त्या वेळी त्यांना आदाम (मानव) हे नाव दिले.
3आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश, त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला, त्याचे नाव त्याने शेथ ठेवले;
4शेथ झाल्यावर आदाम आठशे वर्षे जगला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
5आदाम एकंदर नऊशे तीस वर्षे जगला; मग तो मरण पावला.
6शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश झाला;
7अनोश झाल्यावर शेथ आठशे सात वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
8शेथाचे एकंदर आयुष्य नऊशे बारा वर्षांचे झाले; मग तो मरण पावला.
9अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान झाला;
10केनान झाल्यावर अनोश आठशे पंधरा वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
11अनोशाचे एकंदर आयुष्य नऊशे पाच वर्षांचे झाले; मग तो मरण पावला.
12केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल झाला;
13महललेल झाल्यावर केनान आठशे चाळीस वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
14केनानाचे एकंदर आयुष्य नऊशे दहा वर्षांचे झाले, मग तो मरण पावला.
15महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद झाला;
16यारेद झाल्यावर महललेल आठशे तीस वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
17महललेल ह्याचे एकंदर आयुष्य आठशे पंचाण्णव वर्षांचे झाले, मग तो मरण पावला.
18यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला हनोख झाला;
19हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
20यारेदाचे एकंदर आयुष्य नऊशे बासष्ट वर्षांचे झाले. मग तो मरण पावला.
21हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला;
22मथुशलह झाल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
23हनोखाचे एकंदर आयुष्य तीनशे पासष्ट वर्षांचे झाले;
24हनोख देवाबरोबर चालला. त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले.
25मथुशलह एकशे सत्त्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख झाला;
26लामेख झाल्यावर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
27मथुशलहाचे एकंदर आयुष्य नऊशे एकोणसत्तर वर्षांचे झाले. मग तो मरण पावला.
28लामेख एकशे ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला मुलगा झाला;
29त्याचे नाव त्याने नोहा असे ठेवले; तो म्हणाला, “जी भूमी परमेश्वराने शापित केली तिच्यासंबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट ह्यांविषयी हा आमचे सांत्वन करील.”
30नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला, त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
31लामेखाचे एकंदर आयुष्य सातशे सत्त्याहत्तर वर्षांचे झाले. मग तो मरण पावला.
32नोहा पाचशे वर्षांचा झाला तेव्हा त्याला शेम, हाम व याफेथ हे झाले.

Istaknuto

Podijeli

Kopiraj

None

Želiš li svoje istaknute stihove spremiti na sve svoje uređaje? Prijavi se ili registriraj