मत्तय 8

8
कोळी ना रोगीले चांगल करन
(मार्क 1:40-45; लूक 5:12-16)
1जव येशु त्या डोंगर वरून उतरणा, त एक मोठी गर्दी तेना मागे चालू लागणी. 2आणि एक माणुस कोळी ना आजार कण पिळीत होता, येशु जोळे ईसन प्रणाम कर, आणि तेले सांग, “हे प्रभु जर तुनी ईच्छा शे, त तू मले बरा करू#8:2 तू मले बरा करू जुना करार मा मोशे ना नियम नुसार कोळी आजार ना लोकस्ले अशुद्ध मानत होतात. लेवीव्यवस्था 13:46, सकस.” 3येशु नि हात पुळे करीसन तेले हात लाव, आणि सांग, “मनी ईच्छा शे, तू बरा हुई जा” आणि तो लगेच कोळ पासून बरा हुईग्या. 4येशु नि तेले सांग, “देख, कोले बी नको सांगजो, पण जाईसन स्वता ले यहुदी पुजारी कळे दाव आणि जो चढवा मोशे नि ठरायेल शे तेले चळाव, एनासाठे कि तेस्ना साठे साक्षी होवो.”
एक सेनापती ना विश्वास
(लूक 7:1-10)
5आणि जव येशु कफर्णहूम नगर मा उना, त शंभर सैनिकस्ना रोमी अधिकारी येशु जोळे ईसन, तेस्ले विनंती करी. 6“हे प्रभु, मना दास घर मा लखवा ना आजार मा पडेल शे जो हालू नई सकस.” 7येशु नि तेले सांग, “मी ईसन तेले बरा करसू.” 8तो अधिकारी जो यहुदी नई होता, येशु ले उत्तर दिधा, “हे प्रभु, मी एना योग्य नई, कि तू मना घर मा येवो, पण फक्त तोंड कण सांगी दे त मना दास बरा हुई जाईन. 9मले माहिती शे, कारण कि मनावर बी आदन्या देणारा अधिकारी लोक शेत, आणि शिपाई मना हात मा शे, आणि जव एक ले सांगस, जा, त तो जास, आणि दुसराले कि ये, त तो येस, आणि आपला दास ले सांगस, कि हय कर, त तो करस.”
10हय आयकीसन येशु ले आश्चर्य वाटण, आणि ज्या तेना मांगे ईऱ्हायंतात तेस्ले सांग, “मी तुमले खरज सांगस, कि मले पुरा इस्त्राएल देश मा एक बी असा माणुस नई भेटणा, जो ह्या दुसरा जाती ना माणुस सारखा मनावर विश्वास करस. 11आणि मी तुमले सांगस, कि गैरा सावटा अन्यजाती लोक पूर्व आणि पश्चिम दिशा तून ईसन अब्राहाम आणि इसहाक आणि याकोब ना संगे परमेश्वर ना राज्य मा संगती करतीन. 12पण यहुदी लोकस्ले ज्या परमेश्वर ना राज्य मा राहाले पाहिजे तेस्ले बाहेर अंधकार मा फेकामा ईन, तठे रळना आणि दुख मुळे दातखाने हुईन.” 13आणि येशु नि अधिकारी ले सांग, “घर जा, जसा तुना विश्वास शे, तसाच तुना साठे होवो.” आणि तेना दास त्याच टाईम ले बरा हुईग्या.
गैरा रोगीस्ले चांगल करन
(मार्क 1:29-34; लूक 4:38-41)
14येशु नि पेत्र ना घर मा ईसन तेनी सासूले कळक ताप मा पळेल देखना. 15तेनी तीना हात ले स्पर्श करा आणि तीना ताप उतरी ग्या, आणि ती उठीसन तेनी सेवा कराले लागणी. 16जव संज्याकाय होयनी तव त्या तेना कळे गैरा लोकस्ले लयनात जेस्ना मा दुष्ट आत्मा होती आणि तेनी त्या आत्मास्ले फक्त आपला शब्द कण आज्ञा दिसन काळी टाक, आणि सर्वा आजारीस्ले बरा करा. 17कारण कि जे वचन यशया भविष्यवक्ता ना व्दारा सांगामा एयेल होत ते पूर होवो. “तेनी स्वता आमनी कमजोरीले ली लीधा आणि आमना आजारस्ले उचली लीधा.”
येशु ना शिष्य होवाना महत्व
(लूक 9:57-62)
18येशु नि आपला चारीस कळे एक मोठी गर्दी देखी आणि तेनी तेना शिष्यस्ले सांग “या आमी समुद्र ना त्या पार जावूत.” 19जसा त्या जावाले तयार हुई ऱ्हायंतात आणि एक यहुदी लोकस्ना मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि जोळे ईसन तेले सांग, हे गुरु, मी तुना शिष्य बनासाठे तुना मांगेच चालसू. 20येशु नि तेले सांग, “कोल्हास्ना गुफा आणि आकाश ना पक्षीस्ना खोपा ऱ्हातस, पण मले, माणुस ना पोऱ्या साठे मना जोळे एक घर बी नई शे जठे मी जपी सकू.” 21एक आखो शिष्य नि तेले सांग, हे प्रभु, मले पयले घर परत जाऊ दे. मना बाप ले मरा नंतर, मी बाप ले गाळसु आणि तव मी ईसन तुना मांगे चालसू. 22येशु नि तेले सांग, “तू मना शिष्य बनासाठे मना मांगे ये, आणि ज्या लोक आत्मिक रूप कण मरेल शेतस, तेस्ले आपला मुर्दास्ले गाळू दे.”
वारा वांधी ले शांत करन
(मार्क 4:35-41; लूक 8:22-25)
23जव तो नाव वर चळना, त तेना शिष्य तेना मागे चालू लागनात. 24आणि, समुद्रा मा एक अशी जोरदार वारा वांधी चालू हुईनी आणि नाव लाठास कण झाकावू लागणी, आणि येशु जपी ऱ्हायंता 25तव तेस्नी जोळे ईसन तेले जागाळ, आणि सांग, “हे प्रभु, आमले वाचाळ, आमी सर्वा डुबी ऱ्हायनूत.” 26तेनी तेस्ले सांग, “ओ बिगर विश्वासीहोण, तुमी काबर घाबरतस?” तव तो उठीसन वारा वांधी आणि पाणी ले धमकाव, आणि समुद्र बिलकुल शांत हुईग्या. 27आणि लोक आश्चर्य करीसन सांगाले लागनात, हवू कसा माणुस शे? कि वारा वांधी आणि पाणी बी तेनी आदन्या मानतस.
दुष्ट आत्मा लागेल माणसस्ले चांगल करन
(मार्क 5:1-20; लूक 8:26-39)
28जव तो त्या पार गरसेकर ना प्रांत मा पोहचना, त दोन माणस ज्या दुष्ट आत्मा कण ग्रसित होतात मसानखाई मधून निघीसन तेले भेटनात, ज्या इतला हिंसक होतात, कि कोणी त्या रस्ता वरून जावू सकत नई होतात. 29आणि, तेस्नी आराया मारीसन सांग, “हे परमेश्वर ना पोऱ्या, आमन तुनाशी काय काम? काय तू टाईम ना पहिले आमले दुख देवाले आठे एयेल शे?” 30तेस्ना तून हाकी दूर गैराच डुक्करस्ना गवारा चरत होता. 31दुष्ट आत्मास्नी येशु ले हय सांगीसन विनंती करी, “कदी तू आमले काळस, त डुक्करस्ना गवारा मा धाळी दे.” 32तेनी तेस्ले सांग, “जावा!” आणि त्या निघीसन डुक्करस्मा घुशी ग्यात आणि सर्वा गवारा किनारा ना उतार नि जगावरुन पयत तलाव मा पळी गया आणि डुबी मरणा. 33आणि चारणारा पईनात, आणि नगर मा आणि गावस्मा जाईसन ह्या सगळ्या गोष्टी आणि जेनामा दुष्ट आत्मा होत्यात, तेना पुरा हाल सांगी आयकाळ. 34आणि सर्वा नगर ना लोक येशु ले भेटाले निघी उनात आणि तेले देखीसन विनंती करी, कि आमना प्रांत मधून बाहेर निघी जा.

હાલમાં પસંદ કરેલ:

मत्तय 8: AHRNT

Highlight

શેર કરો

નકલ કરો

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in