1
मार्क 6:31
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवायलादेखील सवड होईना म्हणून तो त्यांना म्हणाला, “चला, आपण एकान्त ठिकाणी जाऊ या, म्हणजे तेथे तुम्हांला थोडा विसावा घेता येईल.”
مقایسه
मार्क 6:31 را جستجو کنید
2
मार्क 6:4
येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या स्वतःच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या कुटुंबीयांत त्याचा सन्मान होत नसतो.”
मार्क 6:4 را جستجو کنید
3
मार्क 6:34
येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा विशाल समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी प्रबोधन करू लागला.
मार्क 6:34 را جستجو کنید
4
मार्क 6:5-6
काही रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. ह्याशिवाय त्याला तेथे काही करता आले नाही. त्यांच्या अविश्वासाचे त्याला आश्चर्य वाटले. त्यानंतर तो प्रबोधन करीत गावोगावी फिरला.
मार्क 6:5-6 را جستجو کنید
5
मार्क 6:41-43
येशूने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे आभार मानले आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढायला त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले. सर्व जण जेवून तृप्त झाले. त्यानंतर त्यांनी भाकरीच्या व माशांच्या उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या.
मार्क 6:41-43 را جستجو کنید
خانه
كتاب مقدس
برنامههای مطالعه
ویدیوها