YouVersion Logo
Search Icon

हाग्गय 1

1
याहवेहच्या भवनाच्या पुनर्बांधणीचे आव्हान
1दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी, सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन हाग्गय संदेष्ट्याला यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, व प्रमुख याजक, यहोसादाकाचा#1:1 किंवा योसादक पुत्र यहोशुआ यांना उद्देशून आला:
2सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे लोक म्हणतात, ‘याहवेहच्या भवनाच्या पुनर्बांधणीची योग्य वेळ अजून आलेली नाही.’ ”
3मग हाग्गय संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले: 4“भवन उद्ध्वस्त अवस्थेत असताना, तुम्ही स्वतः नक्षीदार तावदाने असलेल्या घरात राहण्यासाठी ही वेळ योग्य आहे काय?”
5सर्वसमर्थ याहवेह म्हणतात ते असे: “तुम्ही तुमच्या आचरणाकडे नीट लक्ष द्या. 6तुम्ही पुष्कळ पेरणी केली, पण कापणी मात्र फारच थोडीच केली. तुम्ही जेवता, पण ते कधीही पुरेसे नसते. तुम्ही पीता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही वस्त्र घालता, पण तुम्हाला ऊब मिळत नाही. तुम्ही वेतन मिळविता, पण तुम्ही ते पुष्कळ भोके असलेल्या खिशांमध्ये ठेवता.”
7सर्वसमर्थ याहवेह म्हणतात ते असे: “तुम्ही तुमच्या आचरणाकडे नीट लक्ष द्या. 8पर्वतावर जा आणि लाकडे घेऊन या आणि माझे भवन बांधा. म्हणजे मी त्यात संतोष पावेन आणि गौरवित होईन,” असे याहवेह म्हणतात. 9“तुम्ही पुष्कळाची आशा केली, परंतु पाहा, तुम्हाला किती थोडेसे मिळाले. तुम्ही जे घरी आणले, मी ते फुंकर घालून उडविले का? सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, कारण माझे भवन ओसाड पडलेले आहे आणि तुम्ही स्वतःच्या घरात व्यस्त आहात. 10म्हणून तुमच्यामुळे आकाशाने त्याचे दव आणि पृथ्वीने तिची उपज आवरून धरले आहे. 11मी शेतावर, डोंगराळ भागांवर, धान्यावर, नव्या द्राक्षारसावर, जैतुनाच्या तेलावर व इतर सर्व ज्यांची भूमीतून उपज होते, लोकांवर आणि पशूंवर, तसेच तुमच्या हाताच्या कष्टाच्या कमाईवर मी अवर्षण बोलाविले आहे.”
12तेव्हा यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, आणि यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक, आणि देशातील अवशिष्ट लोकांनी त्यांचे परमेश्वर याहवेहच्या वाणीचे व हाग्गयाला मिळालेल्या संदेशाचे पालन केले, कारण त्यांचे परमेश्वर याहवेहनेच त्याला पाठविले होते आणि लोकांना याहवेहचे भय वाटू लागले.
13मग याहवेहचा संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहने लोकांना संदेश पाठविला: “मी तुम्हाबरोबर आहे,” याहवेह जाहीर करतात. 14याहवेहने यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेलच्या आत्म्याला व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजकच्या आत्म्याला आणि सर्व अवशिष्ट लोकांच्या आत्म्याला जागृत करून प्रेरित केले. ते आले व त्यांनी त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेहचे भवन बांधण्यास सुरुवात केली. 15हे सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी घडले.
नवीन भवनाच्या गौरवाचे अभिवचन
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी हे घडले.

Currently Selected:

हाग्गय 1: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in