योहान 15

15
येशु खरी दाखलता
1“खरी दाखलता मीच शे, आणि मना बाप शेतकरी शे.” 2प्रत्येक डंग जी मना शी जोळायेल शे, आणि फय नई देत, तो तेले कापी टाकस, आणि जी डंग फय लयस तेले तो छाटस कारण कि जास्त फय दिन. 3तुमी त्या शिक्षा मुळे जे मनी तुमले सांगाले शे, छाटाइ जायेल शेतस. 4तुमी मना मा ऱ्हातस, आणि मी तुमना मा शे. जशी डंग दाखलता मा नई ऱ्हास, त स्वता फय देवू सकत नई, त्याच प्रकारे, तुमी काही बी चांगल नई करू सकतस, जर तुमी मना मा बनीसन नई ऱ्हातस. 5मी दाखलता शे, तुमी फांद्या शेतस, जे मना मा ऱ्हातस, आणि मी तेनामा, त तो गैरा फळ लयस, कारण कि मनातून आल्लग हुईसन तुमी काही बी नई करू सकतस. 6जर कोणी मना मा नई ऱ्हास, त तेले कापीसन फेकामा येस, जव त्या फांद्या सुकी जातस, त तेस्ले गोया करीसन चेटाळी टाकतस. 7जर तुमी मन मा बनीसन राहश्यान, आणि मनी शिक्षा तुमना मा बनीसन राहीन, त जे काही तुमी बाप कळून मांगशान त बाप तुमना साठे करीन. 8मना बाप नि महिमा एना कणच होस, कि तुमी गैरा फय लयोत, तरच तुमी मना शिष्य ठरश्यान. 9जसा बाप नि मना शी प्रेम ठेव, तसाच मनी तुमना शी प्रेम ठेव, मना प्रेम मा बनीसन राहा. 10जर तुमी मनी आज्ञा ना पालन करतस, त मना प्रेम मा बनीसन राहशान, जसा कि मनी आपला बाप नि आज्ञा ना पालन करेल शे आणि तेना प्रेम मा बनीसन ऱ्हास. 11मी ह्या गोष्टी तुमले एनासाठे सांगेल होता, कि मना आनंद तुमना मा ऱ्हावो, आणि तुमना आनंद परिपूर्ण हुई जावो.
शिष्यस्न एक दुसरा ना संगे नात
12“मनी आज्ञा हई शे, कि जसा मी तुमना शी प्रेम करस, त्याच प्रमाणे तुमी बी एक दुसरा वर प्रेम करा, 13एक माणुस ना साठे आपला मित्र ले हय दाखाळाले कि तो तेस्ना संगे प्रेम ठेवस, सर्वास्तून चांगला रस्ता हवू शे कि तो तेस्ना साठे मरी जावो.” 14जे काही आज्ञा मी तुमले देस, जर तेले करा, त तुमी मना मित्र शेतस. 15आते पासून मी तुमले दास नई सांगाव, कारण कि दास ले माहित नई, कि तेना स्वामी काय करस, पण मी तुमले मित्र सांगेल शे, कारण कि मी ज्या गोष्टी आपला बाप कण आयकी, त्या सर्वा तुमले सांगी टाक. 16तुमी मले नई निवाळ पण मनी तुमले निवाळेल शे, आणि तुमले ठराव कारण कि तुमी जायसन फय लयोत, आणि तुमना फय बनीसन राहोत, कारण कि तुमी मना शी संबंध ठेवतस. 17या गोष्ट नि आज्ञा मी तुमले एनासाठे देस, कि तुमी एक दुसरा वर प्रेम करा.
संसार ना द्वेष
18जर संसार ना लोक तुमना शी द्वेष ठेवतस, त तुमले माहित शे, कि तेस्नी तुमना तून पयले मना शी द्वेष ठेवनत. 19जर तुमी ह्या संसार ना लोकस सारखा ऱ्हातात, त संसार ना लोक तुमना वर प्रेम करतात, पण या मुळे कि तुमी संसार ना लोक नई, तुमले संसार ना लोकस मधून निवाडी लीएल शे, कारण कि संसार ना लोक तुमना शी द्वेष करस. 20हई ध्यान मा ठेवा कि जे मनी तुमले सांगेल शे, दास आपला स्वामी प्रेक्षा मोठा नई होस. तेले ध्यान मा ठेवजा, जर तेस्नी मले त्रास दिधा, त तुमले बी त्रास देतीन, जर तेस्नी मनी शिक्षा ना पालन करणात त तुमनी बी पालन करतीन. 21पण त्या हई सगळ काही तुमना संगे करतीन कारण कि तुमी मना शिष्य शेतस आणि त्या मना धाळनारा ले बी नई ओयखतस. 22कदी मी नई येतू, आणि तेस्नाशी नई बोलतू, त त्या पापी नई ठरतात पण आते तेस्ले तेस्ना पाप ना साठे काही बहाणा नई. 23जो मना शी द्वेष ठेवस, तो मना बाप संगे द्वेष ठेवस. 24जर मी तेस्ना मा त्या चमत्कार नई करता, जे आजून कोणीच नई करत त्या पापी नई ठरतात, आते त तेस्नी ज्या मनी चमत्कार ना काम करेल शे देखनात, तरी बी तेस्नी मना आणि मना बाप ना द्वेष करणात. 25हय त्या वचन ले पूर्ण करस जे परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, तेस्नी बिगर कारण ना मना शी घृणा करणात. 26मी बाप कळून तुमना जोळे मदत करणारा धाळसू. ती आत्मा जी बाप कळून ईन, आणि जे सत्य शे तेले प्रगट करीन. जव तो ईन, त तो तुमले मना बारामा सांगीन. 27आणि तुमी संसार ना लोकस्ले मना बारामा सांगश्यान, कारण कि तुमी सुरुवात पासून मना संगे शेतस.

Valgt i Øjeblikket:

योहान 15: AHRNT

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind