मत्तय 25
25
दहा कुमारी पोरीची कथा
1तवा येशूनं शिष्यायले म्हतलं कि, “माणसाचा पोरगा जवा येईन, तवा स्वर्गाचं राज्य अश्या प्रकारे राईन: ते दहा कुवाऱ्या#25:1 दहा कुवाऱ्या हे दहा कुवारीया नवरीन च्या मैत्रीनि हात बाईसारखे हाय, जे आपले दिवे घेऊन नवरदेवाले भेटण्यासाठी निघाल्या. 2त्यायच्यात पाच मूर्ख अन् पाच समजदार होत्या, 3पण मूर्ख कुवाऱ्या बायाईन आपले दिवे तर घेतले पण सोबत कुप्पित तेल नाई घेतलं.
4अन् समजदारायन आपले दिवे तर घेतलेच पण सोबत कुप्पित तेल पण घेतलं 5जवा नवरदेवाले येण्यात वेळ लागला, तवा त्यायले डुलक्या आल्या अन् त्या झोपल्या. 6अर्ध्यारात्री कोणी कल्ला केला, कि पाहा नवरदेव येऊन रायला हाय, त्याले भेटण्यासाठी चला. 7तवा त्या सगळ्या कुवाऱ्या आपले दिवे ठिक करू लागल्या, 8तवा मुर्खांनी समजदारांना म्हतलं, आपल्या कुप्पितल्या तेलातून आमाले द्या, कावून कि आमचे दिवे ईजून रायले हायत,
9पण समजदारांनी उत्तर देलं, कदाचित हे आमाले अन् तुमाले पुरणार नाई तुमी इकनाऱ्यापाशी जा अन् विकत घ्या. 10जवा ते विकत घेण्यासाठी जात होती, तवा नवरदेव आला, अन् पाच समजदार बाया तयार होत्या, ते त्याच्यावाल्या संग लग्नाच्या घरात गेल्या, तवा दरवाजा बंद झाला.
11मंग दुसऱ्या कुवाऱ्या पण येऊन म्हणू लागलेल्या, हे स्वामी हे स्वामी आमच्यासाठी दरवाजा उघडा. 12त्यानं उत्तर देलं, मी तुमाले खरं सांगतो, मी तुमाले ओयखत नाई. 13म्हणून जागे राहा, कावून तुमाले ते दिवस व ते वेळ ठावूक नाई कि माणसाचा पोरगा कधी येईन.”
सिक्याची कथा
(लूका 19:11-27)
14“कावून कि, हे त्या माणसा सारखी दशा हाय, ज्यानं दुसऱ्या देशात जातांना आपल्या दासायले बलावून आपली संपत्ती त्यायच्या हातात सोपून देली. 15त्यानं एकाले पाच हजार सोन्याचे सिक्के अन् दुसऱ्याले दोन हजार सोन्याचे सिक्के व तिसऱ्याले एक हजार सोन्याचे सिक्के त्यायच्या योग्यते प्रमाणे देले, अन् तवा तो गावाले चालला गेला.
16तवा ज्याले पाच हजार सोन्याचे सिक्के भेटले होते, त्यानं पटकन जाऊन व्यापार केला, अन् पाच हजार सोन्याचे सिक्के अजून कमावले. 17अशाचं प्रकारे ज्याले दोन हजार सोन्याचे सिक्के भेटले होते, त्यानहि अजून दोन हजार सोन्याचे सिक्के कमावले. 18पण ज्याले एक हजार सोन्याचे सिक्के भेटले होते, त्यानं जाऊन जमिनीत लपवून ठेवले.”
19“बऱ्याचं दिवसानंतर त्याच्यावाला धनी घरी येऊन त्यायचा लेखा जोखा घेऊ लागला, 20ज्याले पाच हजार सोन्याचे सिक्के दिले होते, त्यानं पाच हजार सोन्याचे सिक्के अजून आणून म्हतलं हे स्वामी तू मले पाच हजार सोन्याचे सिक्के दिले होते, पाहा मी अजून पाच हजार सोन्याच्या सिक्के कमावले हाय. 21त्याच्या घरधन्यान त्याले म्हतलं, धन्य हायस तू चांगल्या अन् विश्वासयोग्य दासा तू थोडसाक मध्ये विश्वासयोग्य रायला, मी तुले बऱ्याचं वस्तुवर अधिकारी बनवतो ये अन् आपल्या घरधन्याच्या संग आनंद कर.
22अन् ज्याले दोन हजार सोन्याचे सिक्के भेटले होते, त्यानं पण येऊन म्हतलं, हे स्वामी पाह्य, तू मले दोन हजार सोन्याचे दिले होते, मी दोन हजार सोन्याचे सिक्के आणखी कमावले. 23त्याच्यावाल्या घरधन्यान त्याले म्हतलं, धन्य हायस तू खऱ्या अन् चांगल्या विश्वासयोग्य दासा थोडसाक मध्ये विश्वासयोग्य रायला, मी तुले बऱ्याचं वस्तुवर अधिकारी बनविण आपल्या घरधन्याच्या संगे आनंद कर.
24तवा ज्याले एक हजार सोन्याचे सिक्के देला होता, त्यानं येऊन म्हतलं हे स्वामी मले मालूम हाय कि तू कठोर माणूस हायस, जती तू पेरलं नाई, ततीसाच तू कापणी करतोस, अन् जती तू पसरवत नाई, ततून तू जमा करतो. 25म्हणून मी भेलो, अन् जाऊन एक हजार सोन्याचे सिक्के मी जमिनीत खोदुन लपवून ठेवले होते, पाह्य, जे तुह्यावाले होते, ते हे हाय.
26तवा त्याच्या घरधन्यान त्याले उत्तर देलं, हे दुष्ट अन् आळशी दासा जती मी पेरले नाईत तती कापतो अन् जती पसरून ठेवले नाईत ततून जमा करतो हे तुले ठावूक होते. 27तर तू माह्याले रुपये सावकारापासी ठेवायचे होते, मंग मी आल्यावर व्याजा सगट वापस घेतले असते, 28म्हणून तो सोन्याचा सिक्का त्याच्यापासून वापस घ्या अन् ज्याच्यापासी दहा हजार सोन्याच्या सिक्का हायत, त्याले द्या.
29कावून की, ज्याच्यापासी देवाच्या वचनाच ज्ञान हाय, त्याले अजून दिल्या जाईन अन् ज्याच्यापासी नाई हाय, जे काई त्याच्यापासी अशीन ते पण वापस घेतल्या जाईन.” 30अन् “ह्या बेकार निरुपयोगी दासाले, बायर अंधारात टाका, जती रडणं अन् दात खानं राईन.”
येशू संसाराचा न्याय करीन
31“जवा मी, माणसाचा पोरगा आपल्या गौरवानं येणार अन् पवित्र देवदूत त्याच्या संग येतील, तवा मी सगळ्या लोकायले न्याय कऱ्यासाठी आपल्या गौरवाच्या सिहासनावर बसीन. 32तवा सगळ्या देशाचे लोकं माह्या समोर जमा केल्या जाईन, अन् जसं मेंढपाळक मेंढरांना बकऱ्या पासून अलग करते, तसेच मी पण एकाले दुसऱ्या पासून अलग करीन.
33तो मेंढरायले आपल्या उजव्या बाजूनं अन् बकऱ्यायले आपल्या डाव्या बाजुन उभं करीन. 34तवा मी जो राजा हाय आपल्या उजव्या बाजुवाल्यायले म्हणीन, हे माह्याल्या बापाचे धन्य लोकोहो या अन् तुमच्यावाल्या राज्याचे अधिकारी व्हा, जो जगाच्या पयले पासून तुमच्यासाठी तयार केला हाय.
35कावून कि मी उपासी होतो, अन् तुमी मले खायाले देलं, मले तहान लागली तुमी मले पाणी पाजल, मी परदेशी होतो अन् तुमी मले आपल्या घरी थांबवलं, 36मी उघडा होतो अन् तुमी मले कपडे घालायले देले, मी बिमार होतो तवा तुमी माह्याली कायजी घेतली, मी जेलात होतो तवा तुमी मले भेटण्यासाठी आले.”
37“तवा धर्मी लोकं त्याले उत्तर देतीन, हे प्रभू आमी तुले कधी उपासी पायलं, अन् खाऊ घातलं, अन् तहानलेलं पायलं अन् पियाले पाणी देलं. 38आमी कधी तुले परदेशी पायलं अन् आपल्या घरी थांबवलं व उघडं पायलं, अन् कपडे घालायले देले,
39आमी कधी तुले बिमार अन् जेलात पायलं अन् तुले भेटण्यासाठी आलो. 40तवा मी, राजा त्यायले उत्तर देणार, मी तुमाले खरोखर सांगतो कि, तुमी जे काई माह्याल्या या लहानातल्या लहान विश्वासी भावामध्ये कोण्या एकाच्या संग केलं ते माह्याल्या संग केलं. 41तवा तो डाव्या बाजूच्या लोकायले म्हणीन, हे श्रापित लोकोहो, माह्याल्या पासून कधी न विझनाऱ्या अग्निकुंडात चालले जा, जे सैतान अन् त्याच्या सैतानी दूताय साठी तयार केले हाय.
42कावून कि मी उपासी होतो, अन् तुमी मले जेव्याले नाई दिलं, मी ताहानलेला होतो, तुमी मले पाणी नाई पाजलं. 43मी परका होतो, अन् तुमी मले आपल्या घरात नाई राऊ देले, मी उघडा होतो, तुमी मले कपडे नाई घातले, मी बिमार अन् जेलात होतो, तवा तुमी माह्याली कायजी नाई घेतली.”
44“तवा ते उत्तर देतीन, हे प्रभू, आमी तुले कधी उपासी, अन् ताहानलेला अन् परदेशी या उघडं या बिमार या जेलात पायलं अन् तुह्याली सेवा नाई केली? 45तवा तो त्यायले उत्तर देईन, मी तुमाले खरं सांगतो कि, तुमी जे या लाहानातून लायण्याले कोण्या एका विश्वासी भावा संग पण चांगलं नाई केलं, त्यायन माह्याल्या संग पण चांगलं नाई केलं. 46अन् ते अनंत दंड भोगतीन, पण धर्मी अनंत जीवनात प्रवेश करतीन.”
Currently Selected:
मत्तय 25: VAHNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.