मत्तय 24
24
येशूनं देवळाच्या विनाशाची भविष्यवाणी केली
(मार्क 13:1-31; लूका 21:5-33)
1जवा येशू देवळातून बायर निघून रायला होता, तवा त्याचे शिष्य देवळाची बनावट दाखव्यासाठी येशू पासी आले. 2येशूनं त्याले म्हतलं, “कि या मोठ्या इमारती ज्यायले तुमी पायत हा, पण मी तुमाले खरं सांगतो कि वैरी ह्या सर्व्या देवळाले नष्ट करीन अन् इथं एक पण दगड नाई दिसन.”
येशूचे वापस येण्याचे चिन्ह
3तवा येशू देवळातून निघून जैतून पहाडावर चढला अन् देवळाच्या समोर उतारावर बसला तवा शिष्यांनी त्याच्यापासी अलग येऊन म्हतलं, “आमाले सांग कि ह्या गोष्टी कधी होतीन, अन् तुह्या वापस यायचा, अन् जगाच्या नष्ट व्हायच्या वाक्तीच चिन्ह काय होईन?” 4येशूनं त्यायले उत्तर देलं, “कि सावध राहा, कोणीहि तुमाले भटकवले नाई पायजे.
5कावून कि बरेचसे असे रायतीन, जे माह्याल्या नावाने येऊन म्हणतीन, कि मी ख्रिस्त हावो, असे म्हणून बऱ्याचं लोकायले विश्वासात घेऊन फसवतीन. 6जवा तुमी लढाया मांग लढायाच्या विषयी आयकसान, तवा तुमी भेऊ नका, कावून कि हे होणे पक्के हाय, पण हा जगाचा अंत नाई हाय. 7-8मंग एका जातीचे लोकं अन्यजातीच्या लोकायवर हमला करतीन, अन् एका देशाचे लोकं दुसऱ्या देशाच्या लोकायच्या विरुध्य लढाई करतीन, अन् कुठीसा पण भूपंक होईन, व अकाल पडीन, हे सगळं दुख लेकरू जन्माच्या दुखा सारखं राईन.
9तवा ते तुमाले दुख द्यासाठी पकडतीन, व तुमाले जीवाने मारतीन, अन् माह्याल्या नावाने अन्यजातीचे लोकं तुमचा राग करतीन. 10अन् बरेचसे लोकं विश्वास करन सोडून देतीन अन् एकदुसऱ्याले पकडवून देतीन, अन् एकादुसऱ्याच वैर करतीन, 11अन् बरेचसे खोटे भविष्यवक्ता येतीन, अन् बऱ्याचं लोकायले धोका देऊन फसवतीन. 12अन् अधर्माचे काम वाढल्या च्याने बरेच लोकं प्रेम करणे सोडून देतीन.
13पण जो जीवनाच्या आखरी परेंत माह्यावर विश्वास टिकून ठेवतीन, तोच वाचवला जाईन. 14अन् राज्याची ही सुवार्था साऱ्या जगातल्या अन्यजाती लोकायले सांगतल्या जाईन, ह्या साठी कि सऱ्या जगाच्या लोकायले देवावर विश्वास कऱ्याचा मौका भेटला पायजे, तवा जगाचा अंत होईन.”
मोठ्या संकटाची सुरुवात
(मार्क 13:14-23; लूका 21:20-24)
15“म्हणून जवा तुमी एक दिवस एक खूप बेकार व्यक्तीले ज्याची चर्चा दानिय्येल भविष्यवक्त्याच्या व्दारे सांगतल्या गेली होती, ते पवित्रस्थानात उभी असलेली पाहान, (जो हे वाचन तो हे समजीन). 16मंग यहुदीया प्रांतातल्या लोकायले लपायसाठी एका पाहाडावर पयावे लागीन, 17जो घराच्या माळ्यावर अशीन त्यानं खाली उतरू नये, 18अन् जो वावरात असेल, त्याने आपले कपडे घेण्यासाठी मांग येऊ नये.
19त्या दिवसात जे गर्भवती, अन् दुध पाजणाऱ्या बाया असतीन त्यांची अवस्था लय भयंकर होईन कावून कि त्यायच्यासाठी पयन लय कठीण राईन. 20अन् प्रार्थना करा, कि तुमाले हिवाळ्यात किंवा आरामाच्या दिवशी पळावं नाई लागाव, 21कावून कि त्यावाक्ती, लय तरास होईन, जे जगाच्या सुरवाती पासून आजवर नाई झाले, अन् नाई कधी होईन. 22अन् जर ते दिवस कम केले नसते, तर कोणताही प्राणी वाचले नसते, पण देवानं आपल्या निवडलेल्या लोकायसाठी ते दिवस घटवले हायत.
23त्यावाक्ती जर कोणी तुमाले म्हणीन, कि पाहा ख्रिस्त अती हाय, या तती हाय तवा विश्वास ठेऊ नका, 24कावून कि खोटे ख्रिस्त, अन् खोटे भविष्यवक्ता येतीन, अन् मोठं-मोठे चमत्कार अन् अद्भभुत कामे दाखवतीन, अन् निवळलेल्या विश्वासी लोकायले पण भरमावतीन. 25पाहा, मी पयले पासून हे सगळं सांगून ठेवलं हाय.
26जर ते तुमाले म्हणतीन, ख्रिस्त सुनसान जागी बायर हाय, तर तती जाऊ नका अन् जर तुमाले म्हतल्या गेलं कि तो कोण्या गुप्त जाग्यावर हायत विश्वास नका ठेवजा. 27कावून कि, जशी वीज पूर्वे पासून निघते अन् पश्चिमे पर्यंत चमकत जाते, तसेच माणसाच्या पोराचं येणं होईन. 28जती शव असेल, ततीच गिधाडे जमतीन, हे चिन्ह दाखवते कि ते दिवस जवळ हाय.”
माणसाच्या पोराचे वापसी येणं
(मार्क 13:24-27; लूका 21:25-28)
29“त्या दिवसात हे दुख संकट येऊन गेल्यावर, मंग सुर्य पटकन अंधारमय होईन, अन् चंद्र ऊजीळ देणार नाई. अभायातून तारे खाली पडतीन, अन् अभायातल्या ताकती हालून जाईन. 30तवा माणसाच्या पोराचे ताकत, अभायात दिसून येईन, अन् तवा पृथ्वीचे सगळे कुळाचे लोकं लय रडतीन, अन् मी, माणसाच्या पोराले मोठ्या सामर्थ्याने व गौरवानं अभायातल्या ढगावर येतांना पायतीन. 31अन् तो तुरहीच्या मोठ्या आवाजाने आपल्या देवदूताले पाठवून अन् ते अभायाच्या या भागातून तर दुसऱ्या भागापरेंत, चार दिशाईतून आपल्या निवळलेल्या लोकायले जमा करीन.”
अंजीराच्या झाडापासून शिकवण
(मार्क 13:28-31; लूका 21:29-33)
32“अन् आता अंजीराच्या झाडाच्या कथेतून शिका, जवा त्या झाडाच्या डांगा कवळ्या होतात, अन् त्याच्यातून कोम निघून, फांद्यातून पत्ते निगु लागतात, तवा तुमाले मालूम होते कि ऊनाया जवळ आला. 33या सारखच जवा तुमी ह्या सर्व्या गोष्टीले होतान पायसान तर जानसाल कि जगाचा शेवट जवळ आला हाय अन् मी, देवाचा पोरगा येत हाय.
34मी तुमाले खरं सांगतो की जतपरेंत हे पूर्ण होणार नाई ततपरेंत ह्या काळाचे लोकं जिवंत रायतीन. 35अभायाचा व पृथ्वीचा नाश होईन, पण माह्य वचन पूर्ण झाल्या शिवाय रायणार नाई.”
जागी राहा
(मार्क 13:32-37; लूका 17:26-30,34-37)
36“अन् ह्या गोष्टी कोणत्या वेळी अन् कोणत्या दिवसात होतीन हे कोणालेच माहीत नाई, देवदूताले पण मालूम नाई, पोराले पण मालूम नाई, फक्त स्वर्गातल्या देवबापालेच मालूम हाय. 37अन् जसं नुहच्या दिवसात झालं होतं, तसचं माणसाच्या पोराचे येणं राईन. 38कावून कि जसे महापुराच्या पूर्वीच्या दिवसामध्ये जोपरेंत नुह जहाजावर चढला नव्हता, त्या दिवसापरेंत लोकं खातपीत जात, अन् त्याच्यात लग्न वगैरे होतं होते,
39अन् जोपरेंत महापुराने त्यायले वावून नाई नेलं, तवा परेंत त्यायले काहीच मालूम नव्हत, तसेच माणसाच्या पोराचे येणं राईन. 40त्यावाक्ती दोघं जन वावरात रायतीन, एकाले घेतलं जाईन अन् दुसऱ्याले सोडलं जाईन. 41दोन बाया चक्कीचा जातं फिरवत असतीन, एकीले घेतले जाईन अन् दुसरीले सोडले जाईन.
42म्हणून येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं, जागी राहा कावून कि तुमाले नाई माईत कि तुमचा प्रभू कोणत्या वेळी येईन. 43पण लक्षात ठेवा कि घरच्या मालकाले मालूम असते कि चोर कोणत्या वाक्ती येईन, तर तो जागत रायला असता, अन् आपल्या घरात चोरी होऊ देली नसती. 44म्हणून तुमी पण तयार राहा, कावून कि ज्या वेळी तुमी विचार पण नाई करसान, त्याचं वेळी माणसाचा पोरगा येवून जाईन.”
विश्वासयोग्य सेवक अन् वाईट सेवक
(लूका 12:41-48)
45“म्हणून तुमच्यात विश्वासयोग्य अन् बुद्धीमान दास कोण हाय, ज्याले त्याच्या मालकाने आपल्या नौकर-चाकरावर अधिकारी केले हाय, कि वेळेवर त्यांना जेवण द्यावं. 46धन्य हाय, तो दास ज्याचा मालक असचं येवून त्याले करतांना पायते. 47मी तुमाले खरं सांगतो, तो त्याले आपल्या साऱ्या धनावर अधिकारी ठेवीन. 48पण जर तो दुष्ट दास विचार करीन, माह्याल्या घरधनी येण्यात उशीर करून रायला,
49तवा तो आपल्या संगी दासांना झोडपून, अन् दारूड्याचा संग खातपीत अशीन, 50तर त्या दासाचा मालक अशा दिवशी येईन, ज्यावाक्ती तो त्याची वाट पण पायतं नशीन, 51अन् त्यावाक्ती तो मालक त्याले लय भारी सजा देईन, त्याच्या भाग कपटी लोकाय संग ठरविन, जती रडणे अन् दात खाणे अशीन.”
Currently Selected:
मत्तय 24: VAHNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.