YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 99

99
परमेश्वर इस्राएलाशी विश्वासू आहे
1परमेश्वर राज्य करतो; लोक कंपित होवोत; तो करूबांवर अधिष्ठित आहे; पृथ्वी थरथर कापो.
2परमेश्वर सीयोनेत थोर आहे; तो सर्व लोकांहून परम थोर आहे.
3ते तुझे थोर व भययोग्य नाव स्तवोत; पवित्र तोच आहे.
4राजाचे सामर्थ्य न्यायप्रिय आहे; तू सरळता प्रस्थापित केली आहेस; तू याकोबात न्याय व नीती अंमलात आणली आहेस.
5परमेश्वराची, आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासनापुढे नमन करा; पवित्र तोच आहे.
6त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन, आणि त्याच्या नावाचा धावा करणार्‍यांपैकी शमुवेल, ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7मेघस्तंभांतून तो त्यांच्याशी बोलला; त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले.
8हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस; तू त्यांना क्षमा करणारा असा देव होतास, तरी त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना शासन करीत होतास.
9परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा, आणि त्याच्या पवित्र डोंगराजवळ नमन करा; कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in