YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 98

98
देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती
स्तोत्र.
1परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे.
2परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे; राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
3त्याने इस्राएलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
4अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने, आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा.
5परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा, वीणेवर सुस्वर स्तोत्र गा.
6कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा.
7समुद्र व त्यातील सर्वकाही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत.
8नद्या टाळ्या वाजवोत; पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत;
9कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे; तो जगाचा न्याय यथार्थतेने करील, व लोकांचा न्याय सरळपणे करील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 98