स्तोत्रसंहिता 76
76
विजयी व न्यायी देव
मुख्य गवयासाठी; तंतुवाद्यांच्या साथीने गायचे आसाफाचे संगीतस्तोत्र.
1यहूदात देव प्रकट झाला आहे; इस्राएलात त्याचे नाव थोर आहे.
2शालेमात त्याचा मंडप आहे; व सीयोनेत त्याचे निवासस्थान आहे.
3तेथे धनुष्याचे बाण, ढाल, तरवार व युद्धसामग्री त्याने मोडून टाकली.
(सेला)
4तू प्रतापी आहेस, लुटीने भरलेल्या पर्वतावर तेजस्वी आहेस.
5कणखर मनाच्या पुरुषांची लूटमार झाली आहे; ते झोपी गेले आहेत; त्यांतील कोणाही बलवानाचे हात चालेनात.
6हे याकोबाच्या देवा, तुझ्या धमकीने रथ व घोडा ह्यांना गाढ निद्रा लागली आहे.
7तुझे, केवळ तुझेच, भय धरले पाहिजे; तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील?
8तू स्वर्गातून आपला निर्णय ऐकवला; तेव्हा पृथ्वी भ्याली व स्तब्ध झाली;
9पृथ्वीवरील सर्व दीनांस तारण्यासाठी, न्यायनिवाडा करण्यासाठी देव उठला, तेव्हा असे झाले.
(सेला)
10कारण मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो; अवशिष्ट क्रोधाने तू आपली कंबर बांधतोस.
11परमेश्वर तुमचा देव ह्याला नवस करा व ते फेडा; ज्याचे भय धरले पाहिजे त्याला त्याच्या सभोवतालच्या सर्वांनी नजराणे आणावेत.
12अधिपतींची हिंमत तो नष्ट करतो; पृथ्वीवरील राजांना तो भयप्रद आहे.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 76: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.