YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 60

60
शत्रूला विरोध करण्यासाठी साहाय्याची याचना
(स्तोत्र. 108:6-13)
मुख्य गवयासाठी; शूशन एदूथ (साक्षीचे भूकमल) ह्या चालीवर शिक्षणासाठी गायचे मिक्ताम नावाचे दाविदाचे स्तोत्र. तो अराम-नहराईम व अराम-सोबा ह्यांच्याशी लढाई करीत असता यवाबाने परत जाऊन क्षाराच्या खोर्‍यात अदोमातले बारा हजार पुरुष मारले तेव्हा रचलेले.
1हे देवा, तू आमचा त्याग केला आहेस, आमची दाणादाण केली आहेस; तू कोपायमान झाला आहेस; तू आम्हांला पूर्वस्थितीवर आण.
2तू भूमी कंपित केली आहेस, ती विदारली आहे; तिची भगदाडे भरून काढ, कारण ती डळमळत आहे.
3तू आपल्या लोकांना कठीण प्रसंग दाखवला आहेस; तू आम्हांला जणू काय झोकांड्या खाण्यास लावणारा द्राक्षारस पाजला आहेस;
4तुझे भय बाळगणार्‍यांना तू ध्वज दिला आहेस; अशासाठी की, तो त्यांनी सत्यासाठी फडकवावा.
(सेला)
5तुझ्या प्रिय जनांनी मुक्त व्हावे, म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे ऐक.
6देव आपल्या पवित्रतेला अनुसरून1 म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन;
7गिलाद माझा आहे व मनश्शे माझा आहे, एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझे राजवेत्र आहे;
8मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे; अदोमावर मी आपले पायतण फेकीन; हे पलेशेथा, माझ्यामुळे तू आरोळी मार.”
9मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल? अदोमात मला कोण नेईल?
10हे देवा, तू आमचा त्याग केलास ना? हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस.
11शत्रूपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे साहाय्य केवळ व्यर्थ आहे.
12देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 60