YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 48

48
सीयोनेचे सौंदर्य व वैभव
कोरहाच्या मुलांचे संगीतस्तोत्र.
1परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे.
2उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे.
3देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे.
4कारण पाहा, राजे एकत्र झाले व एकजुटीने चढाई करून आले.
5हे नगर पाहताच ते विस्मित झाले, व घाबरे होऊन पळत सुटले.
6तेथे त्यांना कंप सुटला; त्यांना प्रसूतिवेदनांप्रमाणे वेदना झाल्या
7पूर्वेच्या वार्‍याने तार्शीशची गलबते तू फोडतोस.
8जे आम्ही ऐकले ते सेनाधीश परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात पाहिले; ते हे की, देव सर्वकाळ ते स्थिर राखील.
(सेला)
9हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले.
10हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे; तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे;
11तुझ्या न्यायकृत्यांमुळे सीयोन डोंगर आनंद पावो; यहूदाच्या कन्या उल्लासोत.
12सीयोनेसभोवती फिरा, तिला फेरा घाला; तिचे बुरूज मोजा;
13तिच्या कोटांकडे लक्ष द्या, तिच्या प्रासादांमधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हांला सांगता येईल.
14कारण हा देव आमचा सनातन देव आहे; तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 48