YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 43

43
बचाव आणि मुक्तीसाठी प्रार्थना
1हे देवा, माझा न्याय कर; भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ; कपटी व कुटिल मनुष्यापासून मला मुक्त कर.
2कारण हे देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस; तू माझा का त्याग केलास? वैर्‍याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे?
3तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर; ती मला मार्ग दाखवोत; तुझ्या पवित्र डोंगरावर, तुझ्या निवासस्थानी मला पोहचवोत;
4म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन; आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन.
5हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरपि त्याचे गुणगान गाईन.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in