YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 125

125
परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे
आरोहणस्तोत्र.
1ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्‍चल व सर्वकाळ टिकणार्‍या सीयोन डोंगरासारखे आहेत.
2यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्वकाळ आपल्या लोकांसभोवती आहे.
3नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नयेत, म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वतनांवर चालणार नाही.
4हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत, त्यांचे कल्याण कर.
5जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल. इस्राएलास शांती असो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in