YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 123

123
दयेची याचना
आरोहणस्तोत्र.
1हे स्वर्गात राजासनारूढ असणार्‍या, मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावतो.
2पाहा, जसे दासांचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात.
3हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर, कारण आमची पुरी नालस्ती होत आहे.
4सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in