YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 122

122
यरुशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना
दाविदाचे आरोहणस्तोत्र.
1“आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ” असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
2हे यरुशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.
3हे यरुशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
4इस्राएलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश ― परमेशाचे वंश ― परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात,
5कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत.
6यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. “तुझ्यावर प्रीती करणार्‍यांचे कल्याण असो.
7तुझ्या कोटात शांती वसो; तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो.”
8माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्यासाठी “तुझ्यामध्ये शांती वसो” अशी मी प्रार्थना करीन.
9परमेश्वर आमचा देव ह्याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for स्तोत्रसंहिता 122