स्तोत्रसंहिता 100
100
उपकारस्तुती करण्याचा आदेश
उपकार मानण्याचे स्तोत्र.
1अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा,
2हर्षाने परमेश्वराची सेवा करा; गीत गात त्याच्यापुढे या.
3परमेश्वर हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हांला उत्पन्न केले; आम्ही त्याचेच आहोत1 आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत.
4त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा.
5कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 100: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.