YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 101

101
नीतीने वागण्याची प्रतिज्ञा
दाविदाचे स्तोत्र.
1दया व न्याय ह्यांविषयी मी गाईन; हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन,
2मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन; तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन.
3मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही; अनाचाराचा मी तिरस्कार करतो; तो मला बिलगणार नाही.
4हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल; मी वाइटाशी परिचय ठेवणार नाही.
5आपल्या शेजार्‍याची गुप्तपणे चहाडी करणार्‍याचा मी विध्वंस करीन; जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही.
6देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्त्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल.
7कपट करणार्‍याला माझ्या घरात थारा मिळणार नाही; असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही.
8देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन, म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणार्‍या सर्वांचा उच्छेद होईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for स्तोत्रसंहिता 101