YouVersion Logo
Search Icon

गणना 7

7
वेदीच्या समर्पणाच्या प्रसंगी करायची अर्पणे
1मग मोशेने निवासमंडप उभा करण्याचे संपवले आणि तो मंडप व त्यातील सर्व सामान हे तैलाभ्यंग करून पवित्र केले, आणि वेदी व तिची सर्व उपकरणे हीसुद्धा तैलाभ्यंग करून पवित्र केली;
2तेव्हा असे झाले की, इस्राएलाचे सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे आणली; हे वंशांचे सरदार असून खानेसुमारी केलेल्या लोकांवर त्यांची देखरेख होती;
3त्यांनी परमेश्वराला अर्पण आणले ते हे : आच्छादलेल्या सहा गाड्या आणि बारा बैल म्हणजे दोघा-दोघा सरदारांमागे एक गाडी आणि प्रत्येक सरदारामागे एक बैल; त्यांनी ती निवासमंडपासमोर सादर केली.
4मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 5“त्यांच्यापासून ती स्वीकार म्हणजे दर्शनमंडपाच्या सेवेसाठी त्यांचा उपयोग होईल आणि ती लेव्यांना ज्याच्या-त्याच्या सेवेप्रमाणे वाटून दे.”
6तेव्हा मोशेने त्या गाड्या व बैल घेऊन लेव्यांना दिले.
7गेर्षोनाच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे दोन गाड्या आणि चार बैल दिले.
8मरारीच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे चार गाड्या व आठ बैल दिले; हे अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली होते.
9पण कहाथाच्या वंशजांना काही दिले नाही, कारण पवित्रस्थानातल्या वस्तू खांद्यांवर वाहून नेण्याची सेवा त्यांना नेमून दिलेली होती.
10वेदीचा तैलाभ्यंग झाला त्या दिवशी सरदारांनी तिच्या समर्पणाचे अर्पण म्हणून ते बैल आणि गाड्या सादर केल्या. म्हणजे सरदारांनी आपले अर्पण वेदीपुढे सादर केले.
11तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की, “वेदीच्या समर्पणासाठी सरदारांनी आपापले अर्पण प्रत्येकाला नेमून दिलेल्या दिवशी सादर करावे.”
12पहिल्या दिवशी ज्याने अर्पण सादर केले तो यहूदा वंशातील अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन होता.
13त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
14धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
15होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
16पापार्पणासाठी एक बकरा;
17शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याचे अर्पण होते.
18दुसर्‍या दिवशी इस्साखाराच्या वंशजांचा सरदार सूवाराचा मुलगा नथनेल ह्याने अर्पण सादर केले.
19त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
20धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
21होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
22पापार्पणासाठी एक बकरा;
23शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे सूवाराचा मुलगा नथनेल ह्याचे अर्पण होते.
24तिसर्‍या दिवशी जबुलूनाच्या वंशजांचा सरदार हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याने अर्पण सादर केले.
25त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
26धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
27होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
28पापार्पणासाठी एक बकरा;
29शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याचे अर्पण होते.
30चौथ्या दिवशी रऊबेनाच्या वंशजांचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने अर्पण सादर केले.
31त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
32धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
33होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
34पापार्पणासाठी एक बकरा;
35शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याचे अर्पण होते.
36पाचव्या दिवशी शिमोनाच्या वंशजांचा सरदार सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीएल ह्याने अर्पण सादर केले.
37त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
38धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
39होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
40पापार्पणासाठी एक बकरा;
41शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल ह्याचे अर्पण होते.
42सहाव्या दिवशी गादाच्या वंशजांचा सरदार दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने अर्पण सादर केले.
43त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
44धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
45होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
46पापार्पणासाठी एक बकरा;
47शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याचे अर्पण होते.
48सातव्या दिवशी एफ्राइमाच्या वंशजांचा सरदार अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याने अर्पण सादर केले.
49त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
50धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
51होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
52पापार्पणासाठी एक बकरा;
53शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याचे अर्पण होते.
54आठव्या दिवशी मनश्शेच्या वंशजांचा सरदार पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने अर्पण सादर केले.
55त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
56धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
57होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
58पापार्पणासाठी एक बकरा;
59शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याचे अर्पण होते.
60नवव्या दिवशी बन्यामीनाच्या वंशजांचा सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याने अर्पण सादर केले.
61त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
62धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
63होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
64पापार्पणासाठी एक बकरा;
65शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते.
66दहाव्या दिवशी दानाच्या वंशजांचा सरदार अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने अर्पण सादर केले.
67त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
68धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
69होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
70पापार्पणासाठी एक बकरा;
71शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याचे अर्पण होते.
72अकराव्या दिवशी आशेराच्या वंशजांचा सरदार आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने अर्पण सादर केले.
73त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
74धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
75होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
76पापार्पणासाठी एक बकरा;
77शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याचे अर्पण होते.
78बाराव्या दिवशी नफतालीच्या वंशजांचा सरदार एनानाचा मुलगा अहीरा ह्याने अर्पण सादर केले.
79त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
80धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;
81होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;
82पापार्पणासाठी एक बकरा;
83शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे एनानाचा मुलगा अहीरा ह्याचे अर्पण होते.
84वेदीला तैलाभ्यंग झाला त्या दिवशी इस्राएल लोकांच्या सरदारांकडून तिच्या समर्पणाचे अर्पण झाले ते हे : चांदीची बारा ताटे, चांदीचे बारा कटोरे व सोन्याची बारा धूपपात्रे;
85प्रत्येक चांदीचे ताट एकशे तीस शेकेलांचे व प्रत्येक चांदीचा कटोरा सत्तर शेकेलांचा अशी एकंदर सर्व चांदीची पात्रे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती;
86धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती; सर्व धूपपात्रांचे सोने एकशे वीस शेकेल होते;
87होमार्पणासाठी एकंदर बारा गोर्‍हे, बारा मेंढे, वर्षावर्षाची नरजातीची बारा कोकरे, ही त्यांच्या बरोबरच्या अन्नार्पणासह होती; तसेच पापार्पणासाठी बारा बकरे होते;
88शांत्यर्पणासाठी एकंदर चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे आणि वर्षावर्षाची नरजातीची साठ कोकरे होती. वेदीला तैलाभ्यंग झाल्यावर तिच्या समर्पणाचे हे अर्पण होते.
89मोशे परमेश्वराशी बोलण्यास दर्शनमंडपात गेला तेव्हा साक्षपटाच्या कोशावर असलेल्या दयासनावरून म्हणजे दोन्ही करूबांमधून झालेली वाणी त्याने ऐकली; ह्या प्रकारे तो त्याच्याशी बोलला.

Currently Selected:

गणना 7: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for गणना 7