YouVersion Logo
Search Icon

लेवीय 12

12
प्रसूतीनंतर मातेच्या शुद्धीकरणाविषयी नियम
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना सांग : स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाल्यास तिने सात दिवस अशुद्ध राहावे; ऋतुकाली जशी ती दूर बसते तशीच ती अशुद्ध समजावी.
3आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी.
4नंतर त्या स्त्रीने आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहेतीस दिवस दूर बसावे. तिची शुद्धी होण्याची मुदत पुरी होईपर्यंत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये व पवित्रस्थानात जाऊ नये.
5तिला मुलगी झाल्यास ऋतुकाली जशी ती दूर बसते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे, आणि आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस दूर बसावे.
6तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची मुदत पूर्ण झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला दर्शनमंडपाच्या दारी याजकाकडे घेऊन जावा.
7मग याजकाने ते परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे ती आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होईल. मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्रीविषयीचा नियम हा.
8तिला मेंढा अर्पण करण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी आणावे, आणि याजकाने तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे ती शुद्ध होईल.”

Currently Selected:

लेवीय 12: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in