योना 2
2
योनाची उपकारस्तुतीची प्रार्थना
1माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली;
2तो म्हणाला, “मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले; अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकलास.
3तू मला डोहात, समुद्राच्या पोटात टाकलेस, प्रवाहाने मला व्यापले; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले.
4मी म्हणालो, ‘तुझ्या दृष्टिवेगळे मला फेकून दिले आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन.’
5जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चोहोकडून मला घेरले; समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले.
6मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते; तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरला आहेस.
7माझा जीव माझ्या ठायी व्याकूळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले; माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहचली.
8जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात;
9पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.”
10परमेश्वराने माशाला आज्ञा केली, तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले.
Currently Selected:
योना 2: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.