YouVersion Logo
Search Icon

ईयोब 35

35
1अलीहू आणखी म्हणाला,
2“‘देवावरील माझी फिर्याद न्यायाची आहे,’ असे तू म्हणतोस काय? हे तुला म्हणण्याचा हक्क आहे असे तुला वाटते काय?
3ह्यास्तव तू म्हणतोस की ‘तुला1 काय लाभ होणार? मी पाप केले असते तर माझे काय कमी झाले असते?’
4मी तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांनाही उत्तर देतो;
5आकाशाकडे दृष्टी देऊन पाहा; हे नभोमंडळ पाहा, हे तुझ्याहून उंच आहे.
6तू पाप केलेस तर देवाचे काय जाते? तुझे अपराध बहुत असले तर त्याचे काय बिघडणार?
7तू नीतिमान असलास तर तू त्याला काय देणार? तुझ्यापासून त्याला काय मिळणार?
8तुझ्या अधर्माचे फळ तुझ्यासारख्या मानवालाच बाधेल; तुझ्या नीतिमत्त्वाचे फळ मानवसंततीलाच लाभेल;
9अतिशय जुलूम झाला म्हणजे लोक आक्रोश करतात; जबरदस्त लोकांचा हात त्यांच्यावर पडला म्हणजे ते साहाय्यासाठी आरोळी मारतात.
10तरीपण असे कोणीही म्हणत नाही की ‘जो रात्रीची स्तोत्रे गायला देतो, तो माझा निर्माणकर्ता कोठे आहे?’
11जो आम्हांला पृथ्वीवरील पशूंहून अधिक शिकवतो, आणि आकाशातील पक्ष्यांहून अधिक ज्ञान देतो, तो कोठे आहे?’
12दुर्जनांच्या उन्मत्तपणामुळे ते असा आक्रोश करतात, पण कोणी ऐकत नाही.
13देव निरर्थक ओरड खरोखर ऐकत नाही; सर्वसमर्थ तिच्याकडे लक्ष देत नाही.
14तू म्हणतोस की त्याचे दर्शन मला घडत नाही; पण हा तुझा वाद त्याच्यासमोरच आहे, तर तू त्याची वाट पाहत राहा;
15पण आता त्याने कोपून दंड केला नाही, त्याने अपराधांकडे फारसे लक्ष पुरवले नाही;
16म्हणून ईयोब आपले तोंड उघडून निरर्थक भाषण करतो, आणि अज्ञानाने वाद माजवतो.”

Currently Selected:

ईयोब 35: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in