YouVersion Logo
Search Icon

ईयोब 25

25
देवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे
1मग बिल्दद शूही म्हणाला,
2“प्रभुत्व चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे; तो उर्ध्वलोकी शांती राखतो.
3त्याच्या सैन्यांची गणती करता येईल काय? त्याचा प्रकाश कोणावर पडत नाही?
4मर्त्य मानव देवापुढे नीतिमान कसा ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला पुरुष निर्मळ कसा ठरेल?
5पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्रही निस्तेज आहे, आणि तारेही निर्मळ नाहीत.
6तर मर्त्य मानव, जो केवळ कीटक, मानवपुत्र जो केवळ कृमी, त्याची काय कथा!”

Currently Selected:

ईयोब 25: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in