YouVersion Logo
Search Icon

होशेय 9

9
सततच्या बेइमानीमुळे इस्राएलाला शिक्षा
1हे इस्राएला, इतर राष्ट्रांप्रमाणे आनंदाने उल्लासू नकोस, कारण तू व्यभिचार करून आपल्या देवाला सोडले आहेस; प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराची कमाई तुला आवडली आहे.
2खळे व द्राक्षकुंड ह्यांनी त्यांचा निर्वाह होणार नाही, नवा द्राक्षारस तिला दगा देईल.
3ते परमेश्वराच्या देशात राहायचे नाहीत; एफ्राईम मिसर देशास परत जाईल; ते अश्शूरच्या देशात अमंगल पदार्थ भक्षण करतील.
4ते परमेश्वराला द्राक्षारसाची पेयार्पणे करणार नाहीत; त्यांचे बली त्याला संतोष देणार नाहीत; त्यांचे अन्न त्यांना सुतक्यांच्या अन्नासारखे होईल; ते खाणारे सर्व अशुद्ध होतील; त्यांचे अन्न त्यांची क्षुधा शांत करण्याकरताच आहे; परमेश्वराच्या मंदिरात ते आणणार नाहीत.
5नेमलेल्या सणाच्या दिवशी व परमेश्वराच्या उत्सवाच्या1 दिवशी तुम्ही काय कराल?
6कारण पाहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत; मिसर त्यांना गोळा करील, मोफ त्यांना मूठमाती देईल; काटेकुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील, त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील.
7समाचार घेण्याचे दिवस आले आहेत; प्रतिफळाचे दिवस आले आहेत; इस्राएलास हे समजून येईल; तुझ्या पापांच्या राशीमुळे, तुझ्या अति वैरामुळे, संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे.
8एफ्राईम माझ्या देवाला हेरणारा आहे; संदेष्टा आपल्या सर्व मार्गांत पारध्याचा फासा आहे; त्याच्या देवाच्या मंदिरात वैरभाव आहे.
9गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अति भ्रष्टाचार केला आहे; तो त्यांचा अधर्म स्मरतो; तो त्यांच्या पापांचे प्रतिफळ देतो.
10रानातल्या द्राक्षांप्रमाणे इस्राएल मला आढळला, अंजिराच्या हंगामातील प्रथमफळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले; पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीला त्यांनी आपणांस वाहून घेतले; त्यांच्या वल्लभांसारखे ते अमंगळ झाले.
11एफ्राइमाचे वैभव पक्ष्यांप्रमाणे उडून जात आहे; जन्म, गर्भारपण व गर्भसंभव ही नाहीत, असे झाले आहे.
12त्यांनी मुले लहानाची मोठी केली, तरी एकही मनुष्य उरणार नाही असे मी त्यांना अपत्यहीन करीन; मी त्यांच्यापासून निघून जाईन तेव्हा त्यांना धिक्कार असो!
13एफ्राईम आपल्या मुलांना बळी देणार्‍या मनुष्यासारखा2 मला दिसला; तो आपल्या मुलांना वध करणार्‍याकडे घेऊन येईल.
14हे परमेश्वरा, त्यांना दे; त्यांना काय देशील? गर्भपात करणारे गर्भाशय व शुष्क स्तन त्यांना दे.
15त्यांची सर्व दुष्टता गिल्गालात आहे, तेथेच त्यांच्याविषयी माझ्या ठायी द्वेष उद्भवला; त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे त्यांना मी आपल्या मंदिरातून घालवून देईन; ह्यापुढे मी त्यांच्यावर प्रीती करणार नाही; त्यांचे सर्व सरदार फितुरी आहेत.
16एफ्राइमावर तडाका बसला आहे; त्याचे मूळ सुकून गेले आहे; त्यांना फळ येणार नाही; त्यांना संतती झालीच तर त्यांच्या गर्भाशयाचे ते प्रिय फळ मी मारून टाकीन.
17माझा देव त्यांचा त्याग करील, कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही, ते राष्ट्राराष्ट्रांतून भटकणारे असे होतील.

Currently Selected:

होशेय 9: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in