YouVersion Logo
Search Icon

होशेय 3

3
होशेय व जारिणी
1मग परमेश्वराने मला म्हटले, “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिच्यावर प्रेम कर.”
2मग मी पंधरा रुपये व दीड मण जव देऊन तिला आपल्यासाठी विकत घेतले.
3मी तिला म्हणालो, “तू पुष्कळ दिवस माझ्याकरता स्वस्थ बसून राहा, जारकर्म करू नकोस, परपुरुषाची होऊ नकोस; मीही तुझ्याशी असाच वागेन.”
4कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.

Currently Selected:

होशेय 3: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in