2 योहान 1
1
1,2निवडलेली बाई1 व तिची मुले ह्यांना, वडील2 ह्यांच्याकडून : जे सत्य आपल्या ठायी आहे व आपल्याबरोबर सर्वकाळ राहील, त्या सत्यामुळे तुमच्यावर मी खरी प्रीती करतो; आणि मीच केवळ नव्हे तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे ते सर्वच करतात.
3देवपित्यापासून व पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपल्याबरोबर राहतील.
4आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्यामुळे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला.
5बाई, आता मी तुला विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी; ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो.
6प्रीती हीच आहे की, आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की, जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे.
7कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.
8आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे म्हणून खबरदारी घ्या.
9ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही; जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली आहे.
10हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका;
11कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.
12मला तुम्हांला पुष्कळ लिहायचे होते, ते कागद व शाई ह्यांनी लिहावेसे वाटत नाही; तर तुमच्याकडे येऊन मला समक्ष बोलता येईल अशी मी आशा बाळगतो; म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल.
13तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला सलाम सांगतात.
Currently Selected:
2 योहान 1: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.