3 योहान 1
1
1प्रिय गायस ह्याला, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील2 ह्याच्याकडून :
2प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टींत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो.
3कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला.
4माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसर्या कशानेही होत नाही.
5प्रिय बंधो, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस;
6त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली; देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरे करशील.
7कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काहीएक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत.
8म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.
9मी मंडळीला थोडेसे लिहिले; परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करत नाही.
10ह्यामुळे मी आलो तर तो जी कृत्ये करतो त्यांची आठवण देईन; तो आमच्याविरुद्ध द्वेषबुद्धीने बाष्कळ बडबड करतो; तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही; आणि तो बंधुजनांचा स्वीकार स्वत:ही करत नाही, आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो व मंडळीबाहेर घालवून देतो.
11प्रिय बंधो, वाइटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणार्याने देवाला पाहिलेले नाही.
12देमेत्रियाविषयी सर्वांनी व स्वत: सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे; आम्हीही साक्ष देतो; आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला ठाऊक आहे.
13मला तुला पुष्कळ लिहायचे होते, पण ते शाईने व लेखणीने लिहिण्याची माझी इच्छा नाही;
14तर मी तुला लवकर भेटेन, अशी मला आशा आहे, तेव्हा आपण समक्ष बोलू.
15तुला शांती असो. मित्रमंडळी तुला सलाम सांगतात. मित्रमंडळीसा ज्याच्या-त्याच्या नावाने सलाम सांग.
Currently Selected:
3 योहान 1: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.