YouVersion Logo
Search Icon

1 तीमथ्य 3

3
ख्रिस्ती मंडळीचे कामदार
1कोणी अध्यक्षाचे3 काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन विश्वसनीय आहे.
2अध्यक्ष अदूष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा.
3तो मद्यपी व मारका नसावा; तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्यलोभ न धरणारा,
4आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा;
5कारण ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील?
6त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा.
7त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी.
8तसेच सेवकही4 गंभीर असावेत; दुतोंडे, मद्यपानासक्त व अनीतीने पैसा मिळवणारे नसावेत;
9विश्वासाचे रहस्य शुद्ध विवेकभावाने राखणारे असावेत.
10त्यांचीही अगोदर पारख व्हावी; आणि निर्दोष ठरल्यास त्यांनी सेवकपण करावे.
11तसेच, स्त्रिया गंभीर असाव्यात, चहाड नसाव्यात, नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात.
12सेवक एका स्त्रीचा पती असावा; ते आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावेत.
13कारण ज्यांनी सेवकपण चांगले चालवले ते आपणांसाठी चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवतात.
14तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले आहे;
15तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.
16सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे;
तो1 देहाने प्रकट झाला,
आत्म्याने नीतिमान ठरला,
देवदूतांच्या दृष्टीस पडला,
त्याची राष्ट्रांत घोषणा झाली,
जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला,
तो गौरवात वर घेतला गेला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for 1 तीमथ्य 3