YouVersion Logo
Search Icon

1 तीमथ्य 2

2
सार्वजनिक उपासनेबाबत सूचना
1तर सर्वांत प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी;
2राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.
3हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे.
4त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.
5कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.
6त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले ह्याची साक्ष यथाकाळी द्यायची आहे.
7ह्या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित (मी ख्रिस्ताठायी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही), विश्वास व सत्य ह्यांसंबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले.
8प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.
9तसेच स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणांस भीडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोती व मोलवान वस्त्रे ह्यांनी नव्हे,
10तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांना शोभते तसे सत्कृत्यांनी आपणांस शोभवावे.
11स्त्रीने सर्वस्वी अधीनतेने निमूटपणे शिकावे.
12स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही; तिने निमूटपणे बसावे.
13कारण प्रथम आदाम घडला गेला, नंतर हव्वा;
14आणि आदाम भुलवला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.
15तथापि मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता ह्यांत त्या राहिल्यास बालकाला1 जन्म देण्याच्या योगे2 त्यांचे तारण होईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for 1 तीमथ्य 2