आणि तेना जावाना टाईम ले जव त्या आकाश कडे देखी ऱ्हायनातात तव अचानक दोन माणस धव्या कपळा घालेल तेस्ना जोळे ईसन उभा ऱ्हायनात. आणि सांगाले लागनात, “ओ गालील जिल्हा ना लोक, तुमी काब उभा ऱ्हायसन ढग कळे देखी ऱ्हायनात? हवूच येशु, जेले परमेश्वर नि तुमना जोळून स्वर्ग मा उचली लीएल शे, ज्या प्रकारे तुमी देखनात कि तेले स्वर्ग मा उचली लीयेल शे, त्याच प्रकारे तेले परत येतांना देखशात.”